गोवा खबर

नंदा तलावावर विकसित बंधाऱ्याचे जलस्त्रोतमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर : जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यंनी कुडचडेचे आमदार  नीलेश काब्राल यांच्या उपस्थितीत कुडचडे मतदारसंघातील घोटमरड काकोडा येथील नंदा तलाव येथे विकसित व सुशोभित केलेल्या बंधाऱ्याचे उद्घाटन करण्यात केले. या बांधकामासाठी एक कोटी रुपये खर्च करण्यात आले.

यावेळी बोलतांना मंत्री शिरोडकर यांनी सुंदर विकसित प्रकल्प पाहून खूप छान वाटले असे सांगून विकासासाठी जनतेचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले. सर्व निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा म्हणजे लोकही त्यांच्या पाठीशी उभे राहतील. गोमंतकीयानी राज्याच्या भल्यासाठी विकासाची सकारात्मक बाजू पाहिली पाहिजे असे ते म्हणाले. आपण निसर्गाचा सांभाळ केला पाहिजे. या तलावातील विविध पक्षी टिपण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी जगभरातील पक्षी निरीक्षक या तलावावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार काब्राल यांनी नंदा तलाव हे रामसर स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर ठळकपणे प्रसिद्ध झाले आहे. देशात फक्त तीन रामसर साइट आहेत असे ते म्हणाले. जैवविविधता स्थळ म्हणून नजीकच्या भविष्यात विकास घडवून आणण्यासाठी स्थानिकांचा पाठिंबा आणि सहकार्य महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले.

कुडचडे काकोडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर उर्फ प्रसन्ना भेंडे यांनी महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास दिसून येत आहे असे सांगितले.

नगरसेवक विश्वास देसाई यांनी ही स्थानिकांची प्रलंबित मागणी होती ती पूर्ण झाली आहे असे सांगितले. संपूर्ण नंदा तलावाच्या विकासासाठी रु.७५ कोटी मंजूर करण्यात आले आहेत ज्याला रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आले आहे कारण ते जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या परिसंस्थेच्या सेवांसाठी आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेले एक ओलीत क्षेत्र आहे.

जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गांवस देसाई, कार्यकारी अभियंता प्रविण पार्सेकर, मोहन रायकर व इतर यावेळी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version