गोवा खबर

‘एचएएल’कडून 240 एरो-इंजिन खरेदी करण्यास सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने दिली मंजुरी

Published

on

Spread the love

गोवा खबर : सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने 2 सप्टेंबर रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (HAL) खरेदी (भारतीय) श्रेणी अंतर्गत भारतीय हवाई दलाच्या (IAF) Su-30 MKI विमानांसाठी सर्व कर आणि शुल्कांसहित 26,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाची 240 एरो-इंजिन (AL-31FP) खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

या एरो-इंजिनचा पुरवठा एक वर्षानंतर सुरू होईल आणि आठ वर्षांच्या कालावधीत पूर्ण होईल. एरो-इंजिनच्या काही प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे इंजिनांमध्ये 54% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री असेल.  हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कोरापुट विभागात या एरो-इंजिनचे उत्पादन केले जाईल.

Su-30 MKI हे  भारतीय वायू दलाच्या सर्वात शक्तिशाली आणि सामरिकदृष्ट्या-महत्त्वाच्या ताफ्यातील एक विमान आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे या एरो-इंजिनांचा पुरवठा भारतीय वायू दलाला आपल्या मोहीमा विनाअडथळा  सुरू ठेवण्यासाठी तसेच देशाच्या संरक्षण सज्जतेला बळकट करण्यासाठी त्यांच्या ताफ्याच्या निर्वाहाची आवश्यकता पूर्ण करेल.

Trending

Exit mobile version