गोवा खबर

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात साधनसुविधांसह दर्जा वाढविणार : राणे

Published

on

Spread the love
गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय हे आता जिल्हा रुग्णालय राहिले नाही. या रुग्णालयला टर्सरी केअर रुग्णालय म्हणून दर्जा दिला जाईल आणि तितक्याच सेवाही दिल्या जातील, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
राज्यातील विविध सरकारी रुग्णालयत वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे. हे वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले जातील. त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत, परंतु त्यावर तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मडगाव दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयत आज दर दिवशी दीड हजारांहून अधिक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे हे रुग्णालय जिल्हा रुग्णालय म्हणताच येणार नाही. या रुग्णालयला टर्सरी केअर रुग्णालयचा दर्जा देणे गरजेचे आहे. केवळ कागदावर दर्जा देऊन काही भागणार नाही. त्यामुळे सर्व साधनसुविधांसह सुसज्ज रुग्णालय म्हणूनच ते टर्सरी रुग्णालय होणार आहे असे ते म्हणाले.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात झपाट्याने सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या जातील. सर्व प्रकारच्या सेवेत संख्यात्मक आणि दर्जात्मक वाढ केली जाईल. आणखी सीसीटीव्ही लावले जातील. अतिरिक्त डॉक्टर, इतर तज्ज्ञांची नेमणूक केली जाईल, असे सांगून राणे म्हणाले, गोव्यात रुग्णालयांसाठी आणखी २५ रुग्णवाहिकांची गरज आहे. या रुग्णवाहिका मिळवून दिल्या जातील. मी स्वतः २ रुग्णवाहिका देणार आहे. खासदार सदानंद शेट तनावडे हे खासदार निधीतून २ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार, असे त्यांनी सांगितले.
मडगाव येथील इस्पितळासाठी २ कार्डियाक रुग्णवाहिका, ५ इतर श्रेणीतील रुग्णवाहिका देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी आणखी रुग्वाहिका लवकर देण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे रुग्णांसाठी त्याचा निश्चितच लाभ होईल.

Trending

Exit mobile version