गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरीस पॅरालिम्पिक्स 2024 मध्ये भारतीय क्रीडापटू प्रीती पाल हिने 100 मी T35 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान X वरील संदेशात म्हणाले, प्रीती पाल हिने #Paralympics2024 मध्ये 100 मी T35 प्रकारात कांस्य पदक जिंकल्यामुळे भारताचा अभिमान आणखी वाढला आहे. तिचे अभिनंदन. हे यश उदयोन्मुख क्रीडापटूंना निश्चितच प्रेरित करेल. #Cheer4Bharat”
मनीष नरवालने रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात मनीष नरवालने रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; मनीष नरवालने P1 पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात रौप्यपदक पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याची अचूकता, एकाग्रता आणि समर्पण यामुळे त्याने पुन्हा एकदा गौरव वृद्धिंगत केला आहे. . #Cheer4Bharat”