गोवा खबर

नवी दिल्लीतील बीएलटीएम २०२४ मध्ये गोवा पर्यटनाच्या दालनास उत्तम प्रतिसाद

Published

on

Spread the love
गोवा खबर : गोवा पर्यटन विभागाने, यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर), द्वारका, नवी दिल्ली येथे २९ ऑगस्ट रोजी आयोजित बिझनेस + लेजर ट्रॅव्हल आणि एमआयसीई (MICE) (बीएलटीएम) २०२४ कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी आपल्या आकर्षण आणि अनुभवांच्या गतिशील श्रेणीचे अनावरण केले.
हे प्रमुख जागतिक प्रवासी उद्योग भागधारकांना एकत्रित करणारे एक अग्रगण्य व्यासपीठ आहे. बीएलटीएम २०२४ मधील गोवा पर्यटन शिष्टमंडळाचे नेतृत्व जीटीडीसीचे विपणन व्यवस्थापक प्रवीणकुमार फळदेसाई, सहायक पर्यटन अधिकारी प्रभाकर गावडे आणि माहिती सहाय्यक उदय नाईक यांनी केले.
बीएलटीएम २०२४ मधील गोवा पर्यटन दालन हे एक आकर्षक आणि दर्शनीय दालन होते ज्याने राज्याची संस्कृती आणि अस्सलता यांचे दर्शन घडवले. या दालनाने राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, अनोखे उत्सव, साहसी पर्यटन सेवा आणि कमी ज्ञात पण तितकाच मंत्रमुग्ध करणारा किनाऱ्यापासून दूरवरचा प्रदेश (hinterland) यावर प्रकाश टाकला. पुनर्संचयित पर्यटनाचा दृष्टीकोन स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य म्हणून गोव्याच्या स्थानावर जोर देऊन, दालनाने पर्यावरण आणि स्थानिक समुदाय दोघांनाही लाभदायक अशा शाश्वत पद्धतींवर लक्ष केंद्रित करून गंतव्यस्थानाचे समग्र दृश्य सादर केले.
गोव्यातील विविध आकर्षणांवरील सादरीकरणाकडे अभ्यागत आकर्षित झाले. गोवा पर्यटन शिष्टमंडळांनी एकादश तीर्थ आणि आगामी सेंट फ्रान्सिस झेवियर प्रदर्शनासंबंधी माहिती दिली, जी राज्याच्या पुनर्संचयित पर्यटन तत्त्वांशी सुसंगत आहे.
गोवा पर्यटन विभागाचे संचालक पर्यटन आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक  सुनील अंचिपाका, आयएएस म्हणाले, “बीएलटीएम २०२४ च्या उत्तम सुरुवातीमुळे आम्हाला आनंद होत आहे. जागतिक मंचावर गोव्यातील विविध पर्यटन सेवा प्रदर्शित करण्यास हा कार्यक्रम योग्य मंच आहे. गोवा हे असे ठिकाण आहे जिथे समृद्ध सांस्कृतिक वारसा, शाश्वत पर्यटन आणि एमआयसीई (MICE) (बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शने) पर्यटनाची क्षमता एकत्र येते. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह गोवा एमआयसीई (MICE) कार्यक्रमांसाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून उत्तम प्रकारे स्थित आहे, जे विश्रांती आणि व्यवसायाचे मिश्रण आहे. शिवाय, स्थानिक समुदायाला समृद्ध करणाऱ्या आणि गोव्याचे अस्सल आकर्षण टिकवून ठेवणाऱ्या पुनर्संचयित पर्यटन पद्धतींसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आराम आणि एमआयसीई (MICE) या दोन्ही पर्यटनासाठी गोव्याचा उच्च-स्तरीय गंतव्यस्थान म्हणून दर्जा प्रबळ करण्यासाठी बीएलटीएम मधील आंतरराष्ट्रीय प्रवासी व्यावसायिक आणि संभाव्य अभ्यागतांशी संलग्न राहणे आवश्यक आहे.”*
जीटीडीसीचे विपणन व्यवस्थापक प्रवीणकुमार फळदेसाई म्हणाले, “बीएलटीएम २०२४ मध्ये आमच्या सहभागामुळे अभ्यागतांना गोव्यातील विविध आकर्षणे आणि जागतिक पर्यटकांसाठी विशेष पर्यटन सेवा जाणून घेता आली. उपस्थितांचा आणि उद्योगातील खेळाडूंचा सकारात्मक प्रतिसाद उत्साहवर्धक होता, ज्यामुळे गोव्याचा पर्यटनासाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून दर्जा स्पष्ट होतो.”
उपस्थितांच्या उत्साही प्रतिसादाने गोव्याच्या प्रसिद्ध समुद्रकिना-याच्या पलीकडे असलेल्या पर्यटन सेवांचा शोध घेण्याची वाढती आवड अधोरेखित केली. अनेकांनी राज्याच्या परंपरा, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याच्या अद्वितीय मिश्रणाबद्दल अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाने प्रवास आणि पर्यटन उद्योगातील प्रमुख भागधारकांशी संपर्क वाढवून, नेटवर्किंगची एक मौल्यवान संधी म्हणून काम केले. या सहभागामुळे एक अग्रगण्य आणि नाविन्यपूर्ण पर्यटन स्थळ म्हणून गोव्याचे स्थान आणखी सक्षम होते.

Trending

Exit mobile version