गोवा खबर

तुये हॉस्पिटलसाठी गावागावात फलक लावून जागृती

Published

on

Spread the love
गोवा खबर : तुये येथे शंभर खाटांचे गोमेकॉकडे जोडले जाणारे हॉस्पिटल लवकर सुरू करावे, या मागणीसाठी तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे सुरू केलेल्या आंदोलनाचा दुसरा टप्पा गावागावात फलक लावून तसेच पत्रके वितरित करून करण्यात येणार आहे.
या जागृतीचा उपक्रम पेडणे बाजारात फलकाचे अनावरण करून झाले. गोवा मेडिकल कॉलेजकडे सलग्न शंभर खाटांच्या हॉस्पिटलची मागणी पूर्ण करा, पेडणेकर यांच्या आरोग्याचे रक्षण करा, अशा आशयाचे फलक चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्व गावागावात लावण्यात येणार आहे. चतुर्थी काळात येणाऱ्या लोकांच्या लक्षात आणून हा विषय गावागावात पोहोचवण्याचा प्रयत्न गावागावात केला जाणार आहे. तसेच पत्रके वितरित केली जाणार आहे.
पेडणे मध्यवर्ती ठिकाणी फलक अनावरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी तुये हॉस्पिटल नागरिक कृती समितीचे पदाधिकारी विजय लोबो तुळशीदास राऊत, देवेंद्र प्रभुदेसाई, राजमुन शेट्ये, व्यंकटेश नाईक, भास्कर नारुलकर, जगन्नाथ देसाई, मनोहर पेडणेकर उपस्थित होते.

Trending

Exit mobile version