गोवा खबर

पर्वरी येथील आस्थापनाने ‘ती’ जाहिरात हटवली

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘पिझ्झा’चे घरपोच वितरण करणार्‍या पर्वरी येथील आस्थापनाने गणेशाला ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारी जाहिरात हटवून त्या ठिकाणी गणेशाचे चित्र लावले. हिंदू जनजागृती समितीने घेतलेल्या आक्षेपानंतर ती जाहिरात हटवण्यात आली. 

गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर संबंधित आस्थापनाच्या पर्वरी येथील दुकानाच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे ‘पिझ्झा डिलिव्हरी बॉय’च्या रूपात दर्शवणारे चित्र रेखाटलेले होते. या चित्रात पॅन्ट आणि शर्ट घातलेला गणेश सायकलवर बसलेला दाखवण्यात आला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर हिंदू जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने आस्थापनाच्या मालकीण कोमल सिंग यांची भेट घेतली. अनावधानाने जाहिरात प्रसिद्ध केल्याचे सिंग यांनी या वेळी सांगितले.  समितीच्या शिष्टमंडळामध्ये दिलीप कुंभार, अरविंद कुमार, राज बोरकर आणि सुशांत दळवी यांचा समावेश होता.

Trending

Exit mobile version