गोवा खबर

दिवाडी बेटाजवळ प्रशिक्षण सरावाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाने त्यांच्या जवानाना वॉटर फ्लडमध्ये जीवन वाचविण्याच्या कार्यासंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मांडवी नदीत दिवाडी बेटाजवळ प्रशिक्षण सरावाचे आयोजन केले आहे. अग्निशमन जवानाना पॉवरबोट हाताळणी आणि जीवन वाचविण्याचे तंत्र यामध्ये प्रशिक्षण देण्यात येईल.

त्यासाठी वरील काळात जलमार्गावरून वाहतूक करणाऱ्या सर्व बार्जेस, प्रवासी लाँच, फेरी बोटी, मासेमारी ट्रॉलरचे टिंडेल आणि पर्यटक बोटी, क्रूझ बोटी इत्यादींसह यांत्रिक आणि बिनयांत्रिकी नाविकांनी वरील कालावधीत प्रशिक्षण सरावास कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगावी, सावकाश वाहतूक करावी आणि आवश्यकता वाटल्यास सुरक्षित अंतरावर थांबावे आणि घटनास्थळी तैनात असलेल्या गस्ती नौकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.

Trending

Exit mobile version