गोवा खबर

होंडा आयटीआयमध्ये मॅकनिक ऑटो इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण अभ्यासक्रम

Published

on

Spread the love

गोवा खबर : कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाने मे. ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन  गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने होंडा सत्तरी येथील सरकारी आयटीआय केंद्रात दुहेरी प्रशिक्षण/अभ्यासक्रम कार्यक्रमाखाली “मॅकनिक ऑटो इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षण“ हा नवीन प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे.

या एका वर्षाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमास राज्य व्यावसायिक प्रशिक्षण मंडळाची संलग्नता आहे. या प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया अगोदरच सुरू झाली असून प्रवेशासाठी शेवटची तारीख ३० ऑगस्ट अशी आहे. इच्छुक उमेदवारांनी ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज केले पाहिजे. अधिक माहितीसाठी आयटीआय कार्यालयांत संपर्क साधावा.

Trending

Exit mobile version