गोवा खबर

चौथ्या अखिल गोवा आंतर महाविद्यालयीन/उच्च माध्यमिक शाळा तियात्र स्पर्धेचे आयोजन 

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा तियात्र अकादमीने कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आजपासून ४  सप्टेंबरपर्यंत दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात चौथ्या अखिल गोवा आंतर महाविद्यालयीन/उच्च माध्यमिक शाळा तियात्र स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा दुपारी ३.३० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

आज दुपारी ३.१५ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप आणि कला अकादमीचे सदस्य सचिव अरविंद खुटकर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित असतील.

आज कुजिरा-बांबोळी येथील एस.एस.धेंपो वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने “उड्ट्टा तो बुड्ट्टा” तियात्र सादर करण्यात येईल. २९ रोजी कार्मेल महिला कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्यावतीने “चुक कोणाची” तियात्र सादर करण्यात येईल. ३० रोजी म्हापसा येथील सेंट झेव्हियर महाविद्यालयाच्यावतीने “चित्रकार” तियात्र सादर करण्यात येईल. २ सप्टेंबर रोजी नावेली येथील रोझरी वाणिज्य आणि कला महाविद्यालयाच्यावतीने “निवलकांटो” तियात्र सादर करण्यात येईल. ३ सप्टेंबर रोजी पिलार येथील फा.आग्नेल महाविद्यालयाच्यावतीने “मोगा म्हाका मोगुच पुरो” तियात्र सादर करण्यात येईल. ४ सप्टेंबर रोजी पिलार येथील फा.आग्नेल उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने “रोमियो ज्युलिएट” तियात्र सादर करण्यात येईल.

Trending

Exit mobile version