गोवा खबर : मुलांचे आरोग्य अधिक सुध्दृढ आणि सक्षम राहण्याच्या आपल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सेंट बार्थोलोम्युज हायस्कूल ( प्राथमिक विभाग) तर्फे त्यांच्या प्राथमिक शाळेतील (इयत्ता १ली ते ४थी) विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष पोषण मुल्यांशी निगडीत विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन मणिपाल हॉस्पिटल गोव्याच्या सहकार्यातून करण्यात आले होते, यामध्ये लहान मुलांच्या मनाचे पोषण घडवण्याबरोबरच मुलांचे योग्य पोषण होऊन सर्वसमावेशक विकासाचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व मणिपाल हॉस्पिटल गोव्याच्या सिनियर डाएटिशियन श्रर्वरी गुडे यांनी केले होते, यावेळी त्यांनी मुलांच्या सर्वसमावेशक वाढीसह सुदृढतेसाठी आवश्यक असलेल्या पोषक घटकांचे महत्त्व अधोरेखित केले. विविध वयोगटातील मुलांच्या पोषणाच्या गरजा आणि रोजच्या आहारात पोषक अन्नाचा कसा सामवेश करावा याबद्दल माहिती या सत्रात त्यांनी दिली.
मनीषा मेंडोन्का यांची उपस्थिती आणि सर फ्रेझेल अफॉन्सो यांच्या समन्वयाने विद्यार्थ्यांना आजीवन शिकणारे म्हणून विकसित करण्याच्या, सर्वांसाठी स्वयं-शिस्त, सचोटी आणि सेवेची मूल्ये रुजवण्याच्या शाळेच्या ध्येयाला अधोरेखित केले.
सेंट बार्थोलोम्युज हायस्कूलने नेहमीच लहान मुलांना एक जागतिक स्तरावरील उत्तम नागरिक आणि नेते बनवण्यावर भर दिला असून शाळेने नेहमीच अध्यात्मासह ज्ञान आणि कुशलतेतील सर्वोत्कृष्टता निर्माण करण्यावर भर दिला आहे. या उपक्रमाचे आयोजन हे शाळेतील मुलांना सक्षम करुन भविष्यातील आव्हानांचा मुकाबला करण्यासह देश आणि मानवतेची जबाबदारी घेण्यासही सक्षम करण्यासाठी केले होते.