गोवा खबर

नियमित आध्यात्मिक साधना केल्याने झोपेतील पक्षाघात होऊ शकतो दूर!

Published

on

शॉन क्लार्क
Spread the love

गोवा खबर : ‘झोपेतील पक्षाघातामागील ६० ते ९० टक्के कारणे पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाची असतात किंवा आध्यात्मिक आणि मानसिक दोन्ही असतात, म्हणून आध्यात्मिक साधना केल्याने आध्यात्मिक समस्येवर मात करण्यास मदत होते, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने केलेल्या आध्यात्मिक संशोधनातून दिसून आले आहे’, अशी माहिती महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे शॉन क्लार्क यांनी दिली

नुकतेच बँकॉक, थायलँड येथे झालेल्या ‘टेंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन पब्लिक हेल्थ (ICOPH2024)’ या परिषदेत ते बोलत होते. त्यांनी ‘झोपेतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय’ हा शोधनिबंध सादर केला. याचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असून क्लार्क सहलेखक आहेत.

ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९६ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ११६ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.

क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्कृती आणि देश यांतील झोपेतील पक्षाघात अनुभवलेल्या ४६ साधकांवर केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष मांडले.

 

Trending

Exit mobile version