गोवा खबर

पर्वरीत राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिवस कार्यक्रम संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंती दिनानिमित्ताने सदभावना दिवस पाळण्यात आला. पर्वरी सचिवालय प्रकल्पात आयोजित कार्यक्रमात वित्त खात्याचे प्रधान सचिव डॉ. व्ही. कांदावेल्लू यांनी राजीव गांधी यांच्या तसबिरीस पुष्पहार घातला आणि सचिवालयांतील कर्मचाऱ्यांना सदभावना दिनाची शपथ दिली. 

देशातील सर्व जाती-धर्मांतील लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा वाढीस लावण्यासाठी प्रत्येक वर्षी २० ऑगस्ट रोजी देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंती दिनी सदभावना दिवस पाळण्यात येतो.

माहिती सचिव सुभाष चंद्र, अतिरिक्त सचिव विकास गावणेकर, एससीईआरटी संचालक मेघना शेटगावकर, इतर सरकारी सचिव, अवर सचिव आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version