गोवा खबर

ट्रायने ‘ऍक्सेस’सेवा प्रदात्यांना केले निर्देश जारी

Published

on

Spread the love

गोवा खबर : ग्राहकांचे फसवणुकीपासून रक्षण करण्यासाठी तसेच संदेश सेवांचा गैरवापर रोखण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

ट्रायने काटेकोरपणे देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ऍक्सेस सेवा प्रदात्यांना 30 सप्टेंबर 2024 पर्यंत 140 मालिकेपासून सुरू होणारे टेलीमार्केटिंग कॉल्स ऑनलाइन डीएलटी प्लॅटफॉर्मवर (डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजीज) स्थलांतरित करण्याचे बंधनकारक केले आहे.

अ. 1 सप्टेंबर 2024 पासून सर्व ऍक्सेस सेवा प्रदात्यांना URL, APK, OTT लिंक्स किंवा प्रेषकांद्वारे श्वेतसूचीबद्ध नसलेले कॉल बॅक क्रमांक असलेले संदेश प्रसारित करण्यास प्रतिबंधित केले जाईल.

ब . संदेशाचे मूळ ठिकाण शोधण्याच्या कार्यात अधिक प्रगती व्हावी यासाठी ट्रायने 1 नोव्हेंबर 2024 पासून प्रेषकांकडून प्राप्तकर्त्यांपर्यंतच्या सर्व संदेशांचा माग शोधून काढण्यासारखा असणे अनिवार्य केले आहे. अपरिभाषित किंवा जुळत नसलेल्या टेलीमार्केटर साखळीसह कोणताही संदेश नाकारला जाईल.

क. प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या टेम्पलेट्सचा गैरवापर रोखण्यासाठी,ट्रायने शिस्तभंग करणाऱ्यांवर दंडात्मक तरतुदी लागू केल्या आहेत.चुकीच्या श्रेणी अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या सामग्री टेम्पलेट काळ्या यादीत टाकले जातील आणि वारंवार हाच गुन्हा केल्यास एक महिन्यासाठी प्रेषकाच्या सेवा निलंबित केल्या जातील.

Trending

Exit mobile version