गोवा खबर

मलेशिया ‘ग्लोबल साऊथ’ देशांमधील एक प्रबळ भागीदार : राष्ट्रपती मुर्मू

Published

on

Spread the love

गोवा खबर : ‘ग्लोबल साऊथ’ देशांमधील एक प्रबळ भागीदार म्हणून मलेशियाकडे भारत पाहत आहे. मलेशिया हा भारताचा आसियानमधील प्रमुख भागीदार असून, भारताचे ऍक्ट ईस्ट धोरण आणि हिंद प्रशांत महासागर दृष्टीकोनातील एक महत्त्वाचा देश असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी ( 20 ऑगस्ट) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मलेशियाचे पंतप्रधान म्हणून भारताच्या दौऱ्यावर प्रथमच आलेल्या पंतप्रधान इब्राहिम यांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या, लोकशाही, बहुसांस्कृतिकता, बहुल्यवाद आणि परस्पर आदर ही समान मूल्ये भारत-मलेशिया संबंधांसाठी मार्गदर्शक शक्ती आहेत. दोन्ही देशांनी आपली भागीदारी आणखी पुढे नेत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करून भारत-मलेशिया संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी कृती-केंद्रित पथदर्शक आराखड्यावर दोन्ही देश काम करत आहेत, याबद्दल मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले.

मलेशियाने 2025 मध्ये आसियानचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या. भारत मलेशियाबरोबर काम करत राहील आणि शांततापूर्ण आणि समृद्ध हिंद प्रशांत महासागर क्षेत्राच्या सामायिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मलेशियाचे राजे सुलतान इब्राहिम यांच्या नुकत्याच झालेल्या राज्याभिषेकाबद्दल राष्ट्रपती मुर्मू यांनी मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम यांच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदनही केले.

इब्राहिम यांच्या भारत दौऱ्याची फलनिष्पत्ती

अनु.क्र. सामंजस्य करार / करार सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीसाठी भारतीय बाजूचे प्रतिनिधी सामंजस्य कराराच्या देवाणघेवाणीसाठी मलेशियन बाजूचे  प्रतिनिधी
1. भारत सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात कामगारांची भरती, रोजगार आणि मायदेशी परत येण्याबाबत सामंजस्य करार

 

 

 

डॉ. एस. जयशंकर,

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

वायबी स्टीव्हन सिम ची केओंग,

मलेशियाचे मनुष्यबळ विकासमंत्री

2. मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात आयुर्वेद आणि इतर पारंपारिक औषध पद्धतींच्या क्षेत्रात सहकार्यावर सामंजस्य करार.

 

डॉ. एस. जयशंकर,

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

वाईबी दातो ‘सेरी उतामा हाजी मोहम्मद बिन हाजी हसन, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मलेशिया
3. मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार.

 

 

 

डॉ. एस. जयशंकर,

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

वायबी दातो गोविंद सिंग देव

डिजिटल मंत्री

मलेशिया

4. भारत प्रजासत्ताक सरकार आणि मलेशिया सरकार यांच्यात संस्कृती, कला आणि वारसा क्षेत्रात सहकार्यावर कार्यक्रम.

 

 

 

डॉ. एस. जयशंकर,

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

वायबी दातो टियोंग किंग सिंग,

पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री,

मलेशिया

5. मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात पर्यटन क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार.

 

 

 

 

डॉ. एस. जयशंकर,

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

वायबी दातो टियोंग किंग सिंग,

पर्यटन, कला आणि संस्कृती मंत्री,

मलेशिया

6. मलेशिया सरकारचे युवा आणि क्रीडा मंत्रालय आणि भारत प्रजासत्ताक सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्यात युवक आणि क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार

 

डॉ. एस. जयशंकर,

भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री

 

वाईबी दातो ‘ सेरी उतामा हाजी मोहम्मद बिन हाजी हसन, परराष्ट्र व्यवहार मंत्री, मलेशिया
7. मलेशिया सरकार आणि भारत प्रजासत्ताक सरकार यांच्यात सार्वजनिक प्रशासन आणि प्रशासन सुधारणांच्या क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार.

 

 

 

भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पूर्व भाग ),जयदीप मुझुमदार YBhg. दातो वान अहमद दहलान हाजी अब्दुल अझीझ, मलेशियाचे सार्वजनिक सेवा महासंचालक

 

8. अंतर्राष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण  (IFSCA) आणि लबुआन वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्यात परस्पर सहकार्याच्या संबंधात सामंजस्य करार..

 

 

बी एन रेड्डी,

मलेशियातील भारताचे उच्चायुक्त

दातो वान मोहम्मद फडझमी चे वान ओथमान फडझिलन,

अध्यक्ष, LFSA

9. 19 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित 9व्या भारत-मलेशिया सीईओ फोरमच्या अहवालाचे सादरीकरण

 

 

भारत-मलेशिया सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक निखिल मेसवानी आणि मलेशिया- इंडिया बिझनेस कौन्सिल (MIBC)चे अध्यक्ष, टॅन श्री कुना सित्तम लम यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि मलेशियाचे  गुंतवणूक, व्यापार आणि उद्योगमंत्री YB तेंगकू दातुक सेरी उतामा जफ्रुल तेंगकू अब्दुल अजीज, यांना संयुक्तपणे अहवाल सादर केला.  

घोषणा

अनु.क्र. घोषणा
1. भारत आणि मलेशियामधील संबंधांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीपर्यंत झेप घेतली आहे.
2. भारत – मलेशिया संयुक्त निवेदन
3 मलेशियाला दोन लाख मेट्रिक टन पांढऱ्या तांदळाचे विशेष वितरण
4. मलेशियाच्या नागरिकांसाठी भारतीय तंत्रज्ञान विषयक आणि आर्थिक सहकार्या अंतर्गत अतिरिक्त 100 जागांचे वितरण

 

5. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) मध्ये संस्थापक सदस्य म्हणून मलेशियाचा सहभाग

 

6. मलेशियातील टुंकू अब्दुल रहमान विद्यापीठात (UTAR),  आयुर्वेद विभागाची स्थापना
7. मलेशियातील मलाया विद्यापीठातील भारतीय संशोधन विभागात थिरुवल्लुवर संशोधनाच्या आंतर्विभागाची स्थापना
8. भारत – मलेशिया स्टार्टअप भागिदारी अंतर्गत दोन्ही देशांमधील स्टार्ट – अप परिसंस्थामध्ये परस्पर सहकार्य

 

9. भारत – मलेशिया डिजिटल परिषद

 

10. 9 व्या भारत – मलेशिया मुख्य कार्यकारी अधिकारी सभेचे आयोजन

Trending

Exit mobile version