गोवा खबर

मायकल लोबो यांना मंत्रिमंडळात मिस करतो : राणे

Published

on

Spread the love
गोवा खबर : आमदार मायकल लोबो हे सामाजिक काम करण्यात अग्रेसर आहेत. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. त्यांची मंत्रिपदाची इच्छा देखील पूर्ण होवो, माझा त्यांना त्याबाबत पाठिंबा आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे काल म्हणाले.
हडफडे येथे एका कार्यक्रमावेळी आरोग्यमंत्री राणे तसेच कळंगुटचे आमदार लोबो एकत्र होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी राणे यांना प्रश्न विचारले. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल, असे जाहीर करतात. तुम्ही मायकलना मंत्रिपद देणार काय? असे विचारले असता, मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील, असे राणे म्हणाले. मात्र मायकल लोबो यांची इच्छा पूर्ण होवो, अशी मी प्रार्थना करतो. लोबो हे स्वतःचे पैसे खर्च करूनही सामाजिक काम करतात. ते सतत लोकांच्या कामांमध्ये व्यस्त असतात. मी त्यांना मंत्रिमंडळात मिस करतो. त्यांना मंत्रिपद मिळत असेल तर मिळावे, असे राणे म्हणाले. तुम्ही लोबोंना मंत्रिपद मिळावे म्हणून कुणाकडे बोलणार आहात काय असे विचारले असता, मी देवाकडे बोलेन असे राणे यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज बुधवारी रात्री दिल्लीला रवाना होणार असून उद्या, गुरुवारी जीएसटी मंत्री गटाच्या बैठकीत भाग घेतील. मुख्यमंत्री सावंत यांची जीएसटी कॉन्सिलवर रियल इस्टेट विभागाच्या मंत्रिगटाचे निमंत्रक म्हणून यापूर्वीच नियुक्ती झालेली आहे. या मंत्रिगटाचे ते निमंत्रक आहेत. या बैठकीव्यितिरिक्त मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय पर्यटनमंत्र्यांची तसेच अन्य दोन मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा २४ रोजी गोवा भेटीवर येत आहेत त्याआधी २३ रोजी रात्री मुख्यमंत्री दिल्लीहून परततील.

Trending

Exit mobile version