राणे म्हणाले , लागवडीखालील जमिनींचे यापुढे कायदेशीररीत्या सेटलमेंट झोनमध्ये रूपांतरण केल्याशिवाय भूखंड करता येणार नाहीत. २५ टक्क्यांपेक्षा जास्त उतरण असलेल्या टेकड्या, डोंगराला हात लावता येणार नाही. अधिकाऱ्यांना अशी प्रकरणे निदर्शनास आल्यास तत्काळ माहिती देण्यास बजावले आहे. अशा प्रकरणात मी कोणाचीही गय करणार नाही. माझ्या मतदारसंघातही एकाने १०० बेकायदा भूखंड पाडल्याची माहिती पंचायतीकडून मला मिळाली आहे. या प्रकरणातही कडक कारवाईचे आदेश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मी मंत्री होण्याआधी नो डेव्हलपमेंट झोन, सखल भागात परवाने दिले असल्यास ते तपासण्याचे निर्देशही दिले आहेत.
राणे म्हणाले, नगरनियोजन मार्गदर्शक तत्त्वांचे कडक पालन करावे लागेल. त्याचबरोबर रोजगारनिर्मितीसाठी गुंतवणूकही सांभाळण्याची गरज आहे. लागवडीखालील जमिनीत बेकायदा भूखंड केल्यास जमिनीच्या क्षेत्रानुसार वर्गवारी करून दंड ठोठावला जाईल. ५ हजार चौ. मी. पेक्षा जास्त, १० हजार ५ हजार चौ.मी. पेक्षा जास्त, १५ हजार ५ हजार चौ.मी.
पेक्षा जास्त अशी वर्गवारी केली जाईल.