गोवा खबर : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“रक्षाबंधनाच्या आनंददायक सणाच्या हार्दिक शुभेच्छा. बहिण भावांमध्ये असलेले पवित्र बंध आणि त्याचबरोबर परस्परांना सहकार्य करत एकमेकांची प्रेमाने काळजी घेण्याची प्रतिबद्धता यांचे प्रतीक असणारा हा सण आहे. या पवित्र दिवशी आपण स्त्रियांची प्रतिष्ठा आणि आदर यांची जपणूक करत, त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव होऊन ती विकसित करता यावी असे वातावरण निर्माण करण्यासाठी कटिबद्ध रहाण्याचा निश्चय करुया.”, असे उपराष्ट्रपतींनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे.