गोवा खबर

मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते दुहेरी मनू भाकरचा सत्कार

Published

on

Spread the love

गोवा खबर : पॅरिस ऑलिम्पिक, 2024 मध्ये दोन  कांस्य पदक जिंकणाऱ्या नेमबाज  मनू भाकरचा आज दिल्लीतील समस्त नाविक समुदायाच्या वतीने केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मनु भाकर ही एका अनुभवी नाविकाची मुलगी आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकणारी एकमेव भारतीय म्हणून तिच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी भारतीय बंदर संघटनेकडून तिला  फुलम गामुसा हे जहाजाचे मॉडेल आणि 10 लाखांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.

मनू भाकर हिने यावेळी युवा  नाविकांशी संवाद साधला. एका नाविक कुटुंबात वाढलेल्या ऑलिंपिक पदक विजेत्या या  नेमबाजाने शिस्त, समर्पण आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे गुण कसे  आत्मसात केले याबद्दल सांगितले. सोनोवाल यांनी मनु भाकरची आई – सुमेधा भाकर -आणि तिचे वडील – राम किशन भाकर यांचाही सत्कार केला. राम भाकर हे मर्चंट नेव्ही जहाजावर मुख्य अभियंता म्हणून काम करतात.

यावेळी बोलताना, केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “पॅरिस ऑलिम्पिकमधील मनू भाकरची अभूतपूर्व कामगिरी ही तिची चिकाटी आणि उत्कृष्टतेप्रति  अथक प्रयत्नांचे द्योतक आहे. महानतेचे ध्येय बाळगण्यासाठी आणि ते साध्य करण्याचे मनोबल बाळगणाऱ्या भारताच्या युवकांच्या आकांक्षांच्या शाश्वत भावनेचे ती प्रतिनिधित्व करते.

मनू भाकर ही आपल्या सर्वांसाठी, विशेषत: आपल्या युवा दर्यावर्दीसाठी एक प्रेरणा आहे. तिने शिस्त, समर्पण आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे गुण तिच्या कुटुंबाकडून आणि नाविक समुदायामध्ये वाढताना कसे  आत्मसात केले हे सांगून सर्वाना प्रेरित केले आहे.

या प्रसंगी बोलताना मनू भाकर म्हणाली,”या वाटचालीत मला  अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र त्यामुळेच माझा निर्धार अधिक  बळकट झाला. माझा अथक प्रयत्न करण्यावर विश्वास आहे -‘मोठे यश मिळवूनच  घरी जा.’ध्येयाइतकाच हा प्रवास महत्वाचा आहे हे ओळखून आपले सर्वस्व अर्पण केले. मला वाटते, नाविक  समुदायाचा हा अंगभूत स्वभाव आहे , याच्याशी ते नक्कीच सहमत असतील.”

सर्बानंद सोनोवाल म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली,सरकारने खेळाडूंमध्ये उत्कृष्टतेची भावना रुजवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी पूरक एक परिसंस्था तयार करण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. यामुळे आपल्या अनेक खेळाडूंना मदत झाली आहे.

Trending

Exit mobile version