गोवा खबर : भारतीय वैद्यकीय संशोधन परीषद (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ICMR) आणि पॅनिशिया बायोटेक (Panacea Biotec) यांनी भारतात डेंग्यू आजाराच्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील तिसरी; रुग्णांवरील प्रत्यक्ष चाचणी (क्लिनिकल चाचणी) सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या महत्त्वाच्या चाचणीमुळे पॅनिशिया बायोटेक द्वारे विकसित भारतातील स्वदेशी निर्मित टेट्राव्हॅलेंट डेंग्यू लस, डेंगी ऑल( DengiAll) या लसीच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन होऊ शकेल. पंडित भागवत दयाल शर्मा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PGIMS), रोहतक येथे या चाचणीतील पहिल्या सहभागीला ही लस देण्यात आली.
“भारतातील पहिल्या स्वदेशी डेंग्यू लसीसाठी या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीची सुरुवात डेंग्यूविरुद्धच्या आमच्या लढ्यात महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. या सर्वव्यापी आजारापासून आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्याची आमची बांधिलकी त्यातून प्रतिबिंबित असून लस संशोधन आणि विकासामध्ये भारताच्या क्षमतांना अधोरेखित करते,असे हा वैशिष्ट्यपूर्ण टप्पा गाठत असताना त्याविषयी बोलताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले.
टेट्राव्हॅलेंट डेंग्यू लस स्ट्रेन (TV003/TV005), मूलतः नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH), यूएसए द्वारे विकसित केले आहे,जगभरातील प्रीक्लिनिकल आणि क्लिनिकल चाचण्यांमध्ये या लशीने आशादायक परिणाम दर्शवले आहेत.पॅनेसिया बायोटेक, ही स्ट्रेन प्राप्त करणाऱ्या तीन भारतीय कंपन्यांपैकी एक असून,विकासाच्या सर्वात प्रगत टप्प्यावर आहे. कंपनीने सर्व प्रकारच्या सेरोटाईप विषाणूंवर उपयुक्त अशी संपूर्ण लस तयार करण्यासाठी या स्ट्रेनवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि या कामासाठी प्रक्रिया पेटंटही मिळवलेले आहे. 2018-19 मध्ये भारतीय लस तयार करण्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्या होत्या ज्याचे आशादायक परिणाम प्राप्त झाले होते.
आयसीएमआर पॅनिशिया बायोटेक यांच्या सहकार्याने, भारतातील 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 19 ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आयोजित करणार असून, ज्यामध्ये 10,335 हून अधिक निरोगी प्रौढ सहभागी होतील.या चाचणीसाठी निधी हा , प्रामुख्याने ICMR द्वारे उपलब्ध होत असून, दोन वर्षांसाठी सहभागींसोबत पाठपुरावा करण्यासाठी Panacea Biotec कंपनीचे त्यास आंशिक निधी समर्थन आहे. हा उपक्रम भारतातील सार्वजनिक आरोग्याच्या सर्वात कठीण आव्हानांपैकी असून एक स्वदेशी लस विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्राच्या वचनबद्धतेचे ते उत्तम प्रातिनिधिक उदाहरण आहे.