गोवा खबर : पोलीस दल, अग्निशमन दल, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण तसेच सुधारात्मक सेवा दलातील 1037 कर्मचाऱ्यांना 2024 या वर्षीच्या स्वातंत्र्य दिननिमित्त शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत.
2024 या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त एकूण 1037 पोलीस कर्मचारी, अग्निशमन, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण (HG&CD) आणि सुधारात्मक सेवा यांना शौर्य आणि सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहेत:-
1. शौर्य पदके
Name of the Medals
Number of Medals Awarded
राष्ट्रपती शौर्य पदके (PMG)
01
शौर्य पदके (GM)
213*
* पोलिस दल-208, अग्निशमन दल-04, होम गार्ड आणि नागरी संरक्षण -01
राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG) आणि शौर्य पदक (GM) अनुक्रमे जीव आणि मालमत्ता वाचवण्याच्यावेळी किंवा गुन्हेगारी रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना अटक करण्यासाठी,अधिकाऱ्यांवर असलेल्या जोखीमीमुळे येणाऱ्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यांच्या संदर्भात, रेअर कॉन्स्पिक्यूअस ॲक्ट आणि कॉन्स्पिक्यूअस ॲक्ट यांच्या अंतर्गत दिले जातात,
राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG)
शौर्य पदक प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी, तेलंगणा पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल चादुवु यादैया यांना राष्ट्रपती शौर्य पदक (PMG) प्रदान करण्यात आले आहे.त्यांनी 25.07.2022 रोजी एका दरोड्याच्या प्रकरणात विशेष उल्लेखनीय शौर्य दाखवले.सोनसाखळी चोरी आणि शस्त्रास्त्र व्यवहारात सहभागी असलेले दोन कुख्यात गुन्हेगार इशान निरंजन नीलमनल्ली आणि राहुल यांना 26.07.2022 रोजी, सायबराबाद पोलिसांनी पकडले, तथापि,या गुन्हेगारांनी श्री चादुवु यादैया, यांच्यावर चाकूने उलट हल्ला चढवला आणि त्याच्या शरीराच्या विविध भागांवर, म्हणजे छाती, शरीराची मागील बाजू, डावा हात आणि पोटावर वारंवार वार केले.त्यामुळे रक्तस्त्राव होऊन चादुवु यांना गंभीर जखमा झाल्या. गंभीर दुखापती झाल्या असूनही, ते त्यांना पकडण्यात यशस्वी झाले. त्यांना 17 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
213 शौर्य पदकांपैकी (GM), 208 पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पदक देण्यात आले आहे, यात जम्मू आणि काश्मिर पोलिस दलातील 31 कर्मचारी, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 17 कर्मचारी, छत्तीसगडचे 15 कर्मचारी, मध्य प्रदेशचे 12, झारखंडमधील प्रत्येकी 07 कर्मचारी, पंजाब आणि तेलंगणामधील कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलातील 52 कर्मचारी, सशस्त्र सेनादलातील (एसएसबी)14 कर्मचारी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) मधील 10 कर्मचारी, सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ)06 कर्मचारी आणि इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) उर्वरित पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.. शिवाय, दिल्ली आणि झारखंड येथील अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 03 GM आणि 01 GM आणि उत्तर प्रदेशातील HG आणि CD कर्मचारी यांना प्रदान करण्यात आली आहेत.
सेवा पदके
विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणारे राष्ट्रपती पदक (PSM) हे सेवा काळातील विशेष प्रशंसनीय कार्यासाठी तर संसाधन आणि कर्तव्यनिष्ठा या भावनेने वैशिष्ट्यपूर्ण अमूल्य सेवा बजावल्याबद्दल गुणवत्ता पदक (MSM)प्रदान केले जाते.
विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या (PSM) 94 राष्ट्रपती पदकांपैकी 75 पोलिस दलातील,08 अग्निशमन सेवा दलातील,08 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी आणि 03 सुधारात्मक सेवेसाठी देण्यात आली आहेत. उत्कृष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या (MSM) 729 पदकांपैकी 624 पदके पोलीस सेवा दलातील , 47 अग्निशमन सेवा दलातील, 47 नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवा दलातील आणि 11 सुधारात्मक सेवा दलातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहेत.
पदक मिळविलेल्या कर्मचाऱ्यांची यादी :
Sl No.
Subject
Number of Awardees
Annexure
1
राष्ट्रपती शौर्य पदक (PMG)
01
List-I
2
Medals for Gallantry (GM)
213
List-II
3
उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक (PSM)
94
List-III
4
Medal for Meritorious Service (MSM)
729
List-IV
5
State Wise/ Force Wise list of Medals Awardees
As per list
List -V
गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातीलविविधगौरवांनीसन्मानितविजेत्यांचीनावेतसेचतपशीलखालीलसूचींमध्येदिलेआहे.