गोवा खबर

पशुधन शेतकऱ्यांना अधिक आर्थिक शाश्वती देते : प्रा. एस. पी. सिंह बघेल

Published

on

Spread the love

गोवा खबर : पशुधन शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांना अधिक आर्थिक शाश्वती देते. शेतकाऱ्यांना पीक उत्पादनांबाबतीत असलेला धोका पशुधन कमी करते, असे केंद्रीय मच्छिउत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी सांगितले.

प्रा. एस. पी. सिंह बघेल आज गोवा आणि केरळ राज्यांतील नोडल अधिकाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या मच्छिउत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयाने पशुधन गणना, सॉफ्टवेयर प्रादेशिक विशिष्ट निपज या विषयावर आयोजित एक दिवशीय प्रादेशिक प्रशिक्षण कार्यक्रमात पणजीत बोलत होते.

पशुधन गणना महत्वाची असून ती देशांत दर पाच वर्षानी होते. दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी धोरण आणि योजना राबविण्यासाठी या गणनेचा उपयोग होतो, असे त्यांनी सांगितले. पशुधन गणना करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यशाळेचा चांगला उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयाचे स्टॅटिस्टिक सल्लागार जगत हझारिका यांनी पशुधन गणना कार्यशाळेविषयी माहिती दिली.

गोवा सरकारचे पर्यावरण सचिव अरूण कुमार मिश्रा आणि आयसीएआरचे संचालक डॉ. बी. पी. मिश्रा यांचेही यावेळी भाषण झाले.

गोवा सरकारच्या पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा सेवा खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी स्वागत केले.  व्ही. पी. सिंग यांनी आभार मानले.

Trending

Exit mobile version