गोवा खबर

गोवा आणि केरळच्या नोडल अधिकार्‍यांसाठी मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयातर्फे पणजीत कार्यशाळा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा आणि केरळच्या राज्य आणि जिल्हा नोडल अधिकार्‍यांसाठी मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालयातर्फे पणजीतील हॉटेल फिदाल्गो येथे आज (13 रोजी) 21 वी पशुधन गणना, सॉफ्टवेअर प्रादेशिक विशिष्ट निपज याविषयी एक दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल आणि गोवा सरकारचे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवामंत्री नीळकंठ हळर्णकर या कार्यक्रमाला संबोधित करतील.

पशुविकास आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव आयएएस अलका उपाध्याय, गोवा सरकारच्या पर्यावरण, पशुविकास आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे सचिव आयएएस अरुण कुमार मिश्रा आणि इतर उच्चाधिकारी प्रशिक्षण सत्राचा भाग म्हणून मेळाव्याला संबोधित करतील.

या कार्यशाळेत 21व्या पशुधन गणनेचे वेळापत्रक, गोवा आणि केरळमधील विशिष्ट निपज विषयी सादरीकरण; वापरकर्ता अधिकारपत्रे, प्रगणक आणि पर्यवेक्षक यावर चर्चा आणि मोबाईल ऍप्लिकेशन आणि डॅशबोर्डवरील प्रशिक्षण यावर विचारमंथन होईल.

Trending

Exit mobile version