गोवा खबर

मोदी यांनी हत्तींच्या संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या व्यापक सामुदायिक प्रयत्नांचे केले कौतुक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने हत्तींच्या संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या व्यापक सामुदायिक प्रयत्नांचे कौतुक केले. हत्तींच्या वाढीसाठी अनुकूल असा अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी हत्तींचे मूल्य आणि आपल्या संस्कृतीत आणि इतिहासात असलेले त्यांचे महत्वपूर्ण स्थान  अधोरेखित केले. गेल्या काही वर्षांत हत्तींच्या संख्येत झालेल्या वाढीचे देखील त्यांनी कौतुक केले.

पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये लिहिले आहे, जागतिक हत्ती दिन म्हणजे हत्तींच्या संरक्षणासाठी केल्या जाणाऱ्या व्यापक सामुदायिक प्रयत्नांचे कौतुक करण्याचा दिवस आहे. त्याचवेळी हत्तींच्या वाढीसाठी अनुकूल असा अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो. तसेच आमच्यासाठी भारतात हत्ती आपल्या संस्कृती आणि इतिहासाशी जोडलेले आहेत. गेल्या काही वर्षांत हत्तींच्या संख्येत होत असलेली वाढ ही अतिशय आनंदाची बाब आहे.

Trending

Exit mobile version