गोवा खबर

भारतीय नौदल जहाज तबरने केला जर्मन नौदलाच्या सी लिंक्ससोबत सागरी भागीदारी सराव

Published

on

Spread the love

गोवा खबर : भारतीय नौदलाची फ्रिगेट, INS तबरने 5 ऑगस्ट रोजी सेंट पीटर्सबर्ग, रशिया येथून परतताना, कील कालव्याजवळ जर्मन नौदलासोबत सागरी भागीदारी सराव (MPX) केला. INS तबरने यापूर्वी 17 ते 20 जुलै या कालावधीत, जर्मनीतील हॅम्बर्गला भेट दिली होती. दोन्ही देशांमधील सागरी संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा सराव आयोजित करण्यात आला होता.

कील कालव्याजवळ भारतीय नौदल आणि जर्मन नौदल यांच्यातील एमपीएक्सचे आयोजन हे भारतीय नौदलाच्या सर्वदूर पोहोचण्याच्या आणि टिकून राहण्याच्या प्रयत्नांना सूचित करते; तसेच दोन्ही देशांमधील सागरी सहकार्यातील हा महत्त्वपूर्ण मैलाचा टप्पा आहे.

जर्मन नौदलाच्या थर्ड स्क्वाड्रन नेव्हल एअर विंग 5 (MFG5) च्या सी लिंक्ससह MPX मध्ये जहाज नियंत्रित दृष्टीकोन, विंचिंग सराव आणि VERTREP मालिका यासारख्या प्रगत सागरी कारवायांचा समावेश होता. दोन्ही नौदलांच्या तुकड्यांनी उच्च पातळीवरील व्यावसायिकता आणि सहयोगात्मक प्रयत्नांना बळ देण्याप्रति असलेल्या आपल्या  वचनबद्धतेचे दर्शन घडविले.

Trending

Exit mobile version