किंमत स्थिरीकरण साठ्यासाठी केंद्र सरकार द्वारे 4.68 लाख टन कांदा खरेदी
गोवा खबर : सरकारने 4 मे 2024 पासून कांद्यावरील निर्यात बंदी मागे घेतली असून, 550 डॉलर्स (USD) प्रति मेट्रिक टन किमान निर्यात दर (MEP) आणि 40% निर्यात शुल्कासह निर्यातीला परवानगी दिली आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 31 जुलै 2024 पर्यंत देशाची एकूण कांदा निर्यात 2.60 लाख टन इतकी झाली.
कांद्याचे दर स्थिर ठेवण्यासाठीचा साठा (बफर) म्हणून सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना (NCCF) आणि नाफेड (NAFED) अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघा मार्फत महाराष्ट्रातून 4.68 लाख टन कांदा खरेदी केला होता. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे राज्यमंत्री बीएल वर्मा यांनी काल
लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
मागील वर्षाच्या (2023) तुलनेत चालू वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळाला. एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीत महाराष्ट्रातील बाजारपेठेत कांद्याचे सरासरी मासिक दर रु. 1,230 ते रु. 2,578 प्रति क्विंटल इतके होते. मागील वर्षी (2023), याच कालावधीत ते रु. 693 ते रु. 1,205 प्रति क्विंटल इतके होते. चालू वर्षात बफरसाठी कांदा खरेदीचा सरासरी दर रु.2,833 प्रति क्विंटल होता. मागील वर्षाच्या रु.1,724 प्रति क्विंटलच्या खरेदी दरापेक्षा तो 64% जास्त आहे.
भारत हा प्रमुख कांदा निर्यातदार देश असून, तो निर्यातीमधून उत्पन्न मिळवतो. गेल्या तीन वर्षांत भारताने कांदा निर्यातीमधून मिळवलेले एकूण उत्पन्न 2021-22 मध्ये रु.3,326.99 कोटी, 2022-23 मध्ये रु.4,525.91 कोटी आणि 2023-24 मध्ये रु.3,513.22 कोटी इतके होते.
मागील तीन वर्षांतील कांदा उत्पादनाची राज्यनिहाय आकडेवारी, आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी (MoSPI) मंत्रालयाच्या कांद्याचा घरगुती वापर सर्वेक्षण, 2022-23 च्या अहवालामध्ये मोजणी केलेला कांद्याचा वार्षिक घरगुती वापर परिशिष्ट-I मध्ये दिला आहे.
मागील तीन वर्षातील कांद्याची देशनिहाय निर्यात आणि आयात याचा तपशील परिशिष्ट-II मध्ये दिला आहे.
परिशिष्ट-I
गेल्या तीन वर्षांतील (2021-22 ते 2023-24) कांद्याचे प्रत्येक वर्षातील राज्यवार उत्पादन आणि वार्षिक घरगुती वापर 2022-23 लाख मेट्रिक टन मध्ये.
States
2023-24
2022-23
2021-22
Annual Household Consumption 2022-23*
Andhra Pradesh
5.13
9.56
7.23
7.64
Bihar
13.88
13.44
13.75
20.88
Chhattisgarh
3.80
3.93
3.88
3.89
Gujarat
20.57
20.47
25.55
10.55
Haryana
5.41
5.38
5.14
5.82
Karnataka
16.38
26.65
27.80
9.79
Madhya Pradesh
41.66
52.62
47.41
10.87
Maharashtra
86.02
120.33
136.69
17.13
Odisha
3.69
3.69
3.69
6.37
Punjab
2.67
2.49
2.45
5.60
Rajasthan
16.31
16.15
14.48
9.29
Tamil Nadu
4.38
5.25
6.08
14.32
Telangana
1.00
1.29
1.77
3.37
Uttar Pradesh
5.77
5.11
5.09
27.64
West Bengal
8.85
8.92
8.96
14.23
NCT Delhi
0
0
0
2.52
Others
6.62
6.79
6.92
23.71
All India
242.12
302.08
316.87
193.61
स्रोत: कांदा उत्पादन कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाकडून.
कांद्याच्या वार्षिक घरगुती वापराची आकडेवारी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या 2022-23 च्या घरगुती उपभोग सर्वेक्षणाच्या अहवालामधून.
परिशिष्ट-II
भारताची देशवार कांदा आयात मेट्रिक टन मध्ये
Country
2021-22
2022-23
2023-24
BANGLADESH PR
6.59
6.71
7.24
SRI LANKA DSR
1.63
2.71
1.7
MALAYSIA
1.7
3.93
1.67
U ARAB EMTS
1.23
4.03
1.55
NEPAL
1.68
1.76
0.81
INDONESIA
0.38
1.17
0.47
VIETNAM SOC REP
0.18
0.76
0.47
QATAR
0.33
0.8
0.34
OMAN
0.15
0.62
0.28
KUWAIT
0.24
0.45
0.28
OTHERS
1.27
2.13
1.27
TOTAL
15.39
25.27
16.07
Country-wise import of Onion by India in Metric Tons