गोवा खबर

तुयेतील पाणी प्रकल्प जून 2025 पर्यंत पूर्ण होणार

Published

on

नवीन पाणी प्रकल्पाची पाहणी करायला जाताना आमदार जीत आरोलकर. सोबत पाणी विभागाचे अधिकारी संदीप मोरजकर व इतर.
Spread the love
  • आमदार जीत आरोलकर यांची माहिती

गोवा खबर : तुये येथे आयटीआय परिसरात एकूण 67 कोटी रुपये खर्च करून पाणी प्रकल्प उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जून 2025 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याची मुदत कंत्राटदाराजवळ असल्याने जर विलंब झाला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होणार, शिवाय मांद्रे मतदारसंघासाठी एकूण गावागावात 11 नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात येणार आहे. त्यासाठी किमान 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी तुये सरपंच सुलक्षा नाईक, उपसरपंच पेडणेकर, पंच स्विटी नाईक, माजी सरपंच किशोर नाईक, माजी उपसरपंच आनंद साळगावकर, पाणी विभागाचे अधिकारी संदीप मोरजकर आदी उपस्थित होते.

आरोलकर म्हणाले, मांद्रेतील जनतेसाठी भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही. त्यासाठी मुख्यमंत्री सर्वतोपरी सहकार्य करत असल्यामुळे विकासाला गती मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून पाणी प्रकल्प युद्धपातळीवर सुरू आहे. शिवाय पार्से ते आयटीआय पाणी प्रकल्पापर्यंत नवीन जलवाहिनी जोडण्यात आलेली आहे.

पार्से, आगरवाडा, चोपडेपर्यंत जलवाहिनी पाऊस संपल्यानंतर जोडण्यात यणार आहे. काही भागात अजून जलवाहिनी घालण्याचेही काम हाती घेतले जाणार आहे. तसेच गावागावात जिथे पाण्याच्या टाक्या नाहीत तिथे नवीन टाक्या उभारण्यात येणार आहेत. एकूण 11 टाक्या मंजूर झाल्या आहेत. तसेच आधुनिक पद्धतीचे पंपही मंजूर झाले असल्याची माहिती आरोलकर यांनी दिली.

Trending

Exit mobile version