गोवा खबर

अ‍ॅड. अमित सावंत यांना अटक व सुटका

Published

on

अ‍ॅड. अमित सावंत
Spread the love

गोवा खबर : मांद्रेचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच अ‍ॅड. अमित सावंत यांच्याविरोधात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पेडणेच्या अभियंत्याने रस्ता खणल्याप्रकरणी मांद्रे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. या तक्रारीची दखल घेत जामीनपात्र गुन्हा नोंदवून मांद्रे पोलिसांनी सावंत यांना अटक करून त्यांची लगेच सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार मांद्रे पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गटार व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याने गटार उपसण्यासाठी सावंत यांनी काही प्रमाणात रस्त्याचे खोदकाम करून पाण्याला वाट मोकळी करून दिली. याची दखल घेत पेडणेतील बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या अभियंत्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले, पोलिसांनी आपले काम केले आहे. वास्तविक पोलिसांनी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्याची गरज होती. त्यानंतर पुढील कार्यवाही करणे हे त्यांचे कर्तव्य ठरत होते. परंतु तसे न करता आपणास थेट पोलिस स्थानकात बोलावून अटक करण्यात आली. हा जामीनपात्र गुन्हा असल्यामुळे लगेच आपली सुटका करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. अशा तक्रारीची दखल घेऊन आपणास अटक करण्याची जी प्रक्रिया झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद, अशा शब्दात अ‍ॅड. सावंत यांनी नाराजी व्यक्त केली.

Trending

Exit mobile version