गोवा खबर

4 रोजी जोसेफिन डायस पुरस्काराचे वितरण

Published

on

Spread the love

गोवा खबर : तियात्रमधील गीत आणि संगीतातील योगदानाबद्दल गोवा तियात्र अकादमी 4 रोजी दुपारी 3.30 वाजता पाटो पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात लेनिसा मेलानी मास्कारेन्हास या बालकलाकाराला जोसेफिन डायस पुरस्कार प्रदान करणार आहे.

हा पुरस्कार ज्येष्ठ तियात्र कलाकार जोसेफिन डायस यांचे सुपुत्र अरविंद डायस यांनी पुरस्कृत केला आहे. पुरस्कार सोहळ्यानंतर ’डिरेक्टरी ऑफ तियात्र आर्टिस्ट्स 2024‘ आणि ’रिपोर्ट ऑफ द अ‍ॅक्टिव्हिटीज’ चे प्रकाशन होईल. यावेळी 15 व्या कोकणी कांतारा गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही होणार आहे.

सांताक्रूझचे माजी आमदार आंतोनियो फर्नांडिस हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे असतील तर गोव्याच्या तियात्र अकादमीचे माजी अध्यक्ष मेनिनो फर्नांडिस हे सन्माननीय पाहुणे असतील. ज्येष्ठ कलाकार जोसेफिन डायस या निमंत्रित असतील.

फादर डोएल डायस ’डिरेक्टरी ऑफ तियात्र आर्टिस्ट 2024’ या विषयावर बोलतील तर तियात्र अकादमीचे अध्यक्ष सगुण वेळीप, गोवा तियात्र अकादमीद्वारे प्रकाशित होत असलेल्या ’अ‍ॅक्टिव्हिटीजच्या अहवालावर’ बोलतील.

अध्यक्ष सगुण वेळीप आणि तियात्र अकादमीचे सदस्य सचिव सुरेश दिवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

Trending

Exit mobile version