गोवा खबर

तांबोसे राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्ता दुरुस्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Published

on

Spread the love
  • आमदार प्रवीण आर्लेकर व शिष्टमंडळाने घेतली भेट : स्थानिकांमध्ये समाधान

गोवा खबर : तांबोसे राष्ट्रीय महामार्गावरील सर्विस रस्ता आठ दिवसांच्या आत व्यवस्थित करावा, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कंत्राटदाराला दिले आहेत. त्यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

पेडणे तालुक्यातील तांबोसे राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बाजूला असलेला सर्विस रस्ता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्याची डागडूची जर चतुर्थीपूर्वी केली नाही तर या रस्त्यावरून गणेश मूर्तीची ने-आण करताना स्थानिकांना त्रास सहन करावा लागणार होता. याविषयीची समस्या स्थानिकांनी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे मांडली होती. त्यावर आर्लेकर आणि शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेऊन तांबोशी रस्त्याविषयी कैफियत मांडली. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी तातडीने एम वी आर कंपनीच्या कंत्राटदाराला आदेश देताना हा रस्ता आठ दिवसांच्या आत व्यवस्थित करावा, असे निर्देश दिले.

यावेळी मोपा सरपंच सुबोध महाले, ओमकार कानोळकर, केतन सामंत, शैलेश सामंत, प्रकाश सामंत, संतोष शिरोडकर, श्रीकांत पाटील, पंच दयानंद गवंडी आदी उपस्थित होते.

Trending

Exit mobile version