गोवा खबर

राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेसाठी प्रवेशिका

Published

on

Spread the love

गोवा खबर : माहिती आणि प्रसिद्धी खात्याने गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन योजना- 2024 अंतर्गत प्रवेशिका आमंत्रित केल्या आहेत.

छायाचित्र स्पर्धेचे विषय गोव्यातील अज्ञात पर्यटन स्थळ आणि विभाग – 2 साठी उपजिविकेसाठी स्वंय रोजगारास प्रोत्साहन असे आहेत.

प्रत्येक प्रवेशिकेमध्ये छायाचित्राच्या मागील बाजूस छायाचित्रकाराचे नाव, राष्ट्रीयत्व, पोस्टल पत्ता, मोबाईल क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल पत्ता ब्लॉक अक्षरांमध्ये असावा. प्रवेशिकेसोबत वापरलेल्या कॅमेर्‍याचा तांत्रिक तपशील पाठवावा. प्रवेशासाठी मोबाइल प्रतिमांचा विचार केला जाणार नाही. छायाचित्रकाराची छायाचित्रे आणि बायोडेटा 100 शब्दांमध्ये आणि प्रत्येकी निवासी प्रमाणपत्र प्रवेशिकेसोबत जोडावे. सर्व छायाचित्रे मूळ स्वरूपाची आहेत आणि प्रवेशकर्त्याने स्वतः काढलेले प्रमाणपत्र जोडले पाहिजे. प्रवेशकर्त्यांनी उच्च रिझोल्यूशनच्या छायाचित्रासह सॉफ्ट कॉपी पाठवणे आवश्यक आहे, असे कळवण्यात आले आहे.

प्रवेशकर्त्यांनी 12़बाय8 मध्ये रंगीत प्रिंट सादर करणे आवश्यक आहे आणि एक किंवा दोन्ही श्रेणींमध्ये जास्तीत जास्त 4 भिन्न छायाचित्रे पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, वयाची अट नाही आणि कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही. ड्रोनने काढलेले छायाचित्र स्वीकारले जाणार नाही. गोव्यात जन्मलेले आणि मागील 15 वर्षे गोव्यात वास्तव्य असलेल्यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रवेशिकेसोबत निवास दाखला जोडणे आवश्यक आहे.

प्रत्येक श्रेणीतील प्रथम पारितोषिक रोख रू. 20,000, द्वितीय पारितोषिक – रु. 16,000/- आणि तृतीय पारितोषिक रु. 12,000 ट्रॉफी आणि प्रमाणपत्रासह. याशिवाय रु. 2,000 ची पाच उत्तेजनार्त बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येईल.

छायाचित्रे माहिती खात्याची मालमत्ता बनतील आणि गोवा सरकारच्या व माहिती खात्याच्या प्रदर्शनासाठी आणि इतर प्रकाशनांसाठी वापरली जातील. प्रवेशिका सादर करण्याचा शेवटचा दिवस 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. छायाचित्र प्रदर्शन राष्ट्रीय पत्रकारदिनी आयोजित केले जाईल आणि विजेत्यांना 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात बक्षिसे प्रदान केली जातील.

प्रवेशिकेवर गोवा राज्य छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनासाठीच्या प्रवेशिका असे लिहावे. माहिती आणि प्रसिद्धी संचालक, 3 रा मजला, उद्योग भवन, पणजी, गोवा यांच्या नावे पाठवावे. उशिरा पोचलेल्या अर्जांचा स्वीकार केला जाणार नाही, असे कळवण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version