गोवा खबर

उद्योजकता जागृती कार्यक्रमाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर : सुक्ष्म आणि लघू उद्योगास समृद्ध करण्याच्या उद्देशाने मडगाव येथील सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विकास आणि सुविधा कार्यालयाच्या वतीने 16 ते 19 ऑगस्ट 2024 पर्यंत पणजीतील कला अकादमी येथील दर्या संगम येथे तरंग उत्सव विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

गोव्यातील सुक्ष्म आणि लघू उद्योग क्षेत्रातील उत्पादन आणि सेवा आस्थापने या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. स्टॉल नोंदणीसाठी इच्छुक सुक्ष्म आणि लघू उद्योगांनी 8329539407 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, नोंदणी करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट अशी आहे, असे कळवण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version