गोवा खबर

गुरुकृपा संगीत विद्यालय तांबोसे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रम २८ रोजी तोरसेत

Published

on

Spread the love

गोवा खबर : गुरुकृपा संगीत विद्यालय तांबोसे आयोजित वार्षिक गुरुपौर्णिमा उत्सव उद्या (28 रोजी) तोरसे हॉटेल सत्यम नजीक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

संगीतकार तथा गोमंतकीय गायक नाना उर्फ नारायण आसोलकर यांच्या शिष्य वर्गातर्फे हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त सकाळी 9:30 वाजता गुरू पूजन, तर 10 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

या कार्यक्रमाला पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. तसेच कला व सांस्कृतिक संचालनालयाचे उपसंचालक मिलिंद माटे, तोरसे सरपंच स्वाती तोरस्कर, उगवेचे सरपंच सुबोध महाले, मांद्रेचे माजी सरपंच अ‍ॅड अमित सावंत, उद्योजक प्रभाकर मोटे, तोरसेच्या माजी सरपंच तथा विद्यमान पंच प्रार्थना मोटे, बाळ सामंत उपस्थित असणार आहेत.

नाना आसोलकर यांच्या शिष्य वर्गातर्फे गायन वादनाचे कार्यक्रम संपूर्ण दिवसभर सादर केले जाणार आहेत. त्याचे निवेदन अ‍ॅड. मंदार जोशी व प्रदीप हळर्णकर करणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Trending

Exit mobile version