गोवा खबर

आसामच्या चराईदेव मोईदामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

Published

on

Spread the love

गोवा खबर : आसामच्या चराईदेव मोईदामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे  मोदी म्हणाले.

चराईदेव येथील मोईदाम गौरवशाली अहोम संस्कृतीचे दर्शन घडवतात, जे पूर्वजांसाठी अत्यंत पूजनीय होते असे मोदी म्हणाले.

युनेस्को जागतिक वारसा यादीबद्दल युनेस्कोच्या उपरोक्त   एक्स पोस्टला प्रतिसाद  देताना पंतप्रधान म्हणाले, भारतासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब. चराईदेव येथील मोईदाम गौरवशाली अहोम संस्कृतीचे दर्शन घडवतात, जे पूर्वजांसाठी अत्यंत पूजनीय होते.  मला आशा आहे की जास्तीत जास्त लोक महान अहोम साम्राज्य आणि संस्कृतीबद्दल जाणून घेतील.

Trending

Exit mobile version