गोवा खबर : कला आणि संस्कृती संचालनालयाने सुरू केलेल्या मासिक प्रयोग सांज उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी गोव्यातील नाट्यकर्मी व संस्था नाट्य कलाकृती सादर करतात. यानिमित्त 27 रोजी सायंकाळी 6.30 वाजता थिएटर फ्लेमिंगो या संस्थेतर्फे बोरो या कलाकृतीचे सादरीकरण होणार आहे.
या मासिक प्रयोगसांज उपक्रमामध्ये गोमंतकीय ज्या नाट्यसंस्था व रंगकर्मींना आपल्या कलानिर्मिती सादर करावयाच्या असतील त्यांनी खात्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नाट्यरसिकांनी व कलाप्रेमींनी या मासिक प्रयोगासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.