गोवा खबर

25 व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान कारगीलला भेट देणार

Published

on

Spread the love

गोवा खबर : 25व्या कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी सकाळी 9.20 च्या सुमारास कारगिल युध्द स्मारकाला भेट देऊन देशसेवेसाठी कर्तव्यावर असताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीने शिंकून ला या लष्करी बोगद्याच्या कामासाठी सुरुंगाची शुभारंभी वात लावली जाईल.

शिंकून ला बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पदुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा ट्वीन-ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे लेह भागाशी वर्षभरात कोणत्याही मोसमात संपर्क कायम राखण्याची सोय होणार आहे. शिंकून ला बोगदा आपल्या सशस्र दलांच्या तसेच लष्करी सामग्रीच्या जलद आणि कार्यक्षम वाहतुकीची खात्रीशीर सोय होणार असून त्याबरोबरच लडाख परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला देखील चालना मिळेल.

Trending

Exit mobile version