गोवा खबर

पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना वाहिली आदरांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या जयंतीनिनिमित्त अभिवादन केले आहे. गेल्या वर्षी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावेळी केलेले भाषण देखील सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर म्हटलं आहे, “लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. राष्ट्रभक्तीची ज्योत कायम तेवत ठेवण्यासाठी अथक परिश्रम करत असताना त्याचवेळी शिक्षण आणि सेवा या दोन्ही घटकांवर भर देणारे ते एक दूरदर्शी होते. गेल्या वर्षी पुणे येथे मला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी मी केलेले भाषण येथे सामायिक करत आहे.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले, “महान स्वातंत्र्यसैनिक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना श्रद्धांजली वाहतो. अतुलनीय धैर्य आणि भारताच्या स्वातंत्र्याप्रती वचनबद्धता असणारे ते निर्भीड नेते होते. त्यांचे आदर्श आणि विचार आजही लाखो लोकांच्या विशेषतः तरुणांच्या हृदयात आणि मनात प्रतिध्वनित होत आले आहेत.”

 

 

Trending

Exit mobile version