गोवा खबर

‘आप’ आमदार, पंचांच्या नेतृत्वखाली दक्षिण गोवा नागरिक शिष्टमंडळाने घेतली दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची भेट

Published

on

Spread the love
  • सनबर्न विरोधात निवेदन केले सादर
गोवा खबर : आप आमदार क्रुझ सिल्वा आणि चिंचणीचे पंच जर्सन गोम्स यांच्या नेतृत्वखाली दक्षिण गोवा नागरिक शिष्टमंडळ यांनी मंगळवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच सनबर्न विरोधात निवेदन सादर करत दक्षिण गोव्यात सनबर्न महोत्सवाचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येऊ नये अशी विनंती सिल्वा यांनी केली.
सनबर्न जाहीर झाल्यापासून दक्षिण गोवा नागरिक, कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले आहे. मडगावात निदर्शने देखिल झाली. दक्षिण गोव्यातील अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या ठरावात सनबर्न नको असे मत मांडलेले आहे. असे असताना सरकारने जबरदस्तीने सनबर्न दक्षिण गोव्यात आणू नये, अशी मागणी सिल्वा यांनी केली.
आज गावागांवात आणि शाळेतही ड्रग्स पसरलेले आहे.  आज जर दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजकांना आयोजन करण्यास परवानगी दिली तर ड्रग्स सेवनसाठी प्रोत्साहन दिल्यासारखे होईल. आज ऑनलाईनवर सनबर्नवाले तिकिटांची विक्री करत आहे. आज त्यांच्याकडे योग्य परवानगी नाही तरी ते हे तिकिटे विकून सरकारवर नंतर दबाव आणू पाहत आहे. सरकारने आयोजकांविरोधात तातडीने कारवाई करावी, असे सिल्वा म्हणाले.
सोमवारी पावसाळी अधिवेशन दरम्यान रोहन खवंटे सनबर्न आयोजकांना दक्षिण गोव्यात किटल – बेतूल येथे परवानगी मागितली आहे. किटल – बेतूल धार्मिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहेत. अशा धार्मिक ठिकाणी भाजप सरकारला हा महोत्सव साजरा करायचा आहे? बाकी वेळी बजरंगी दल आवाज उठवत असतात आणि आज बजरंगी दल गप्प का, असा सवाल गोम्स यांनी केला.

Trending

Exit mobile version