गोवा खबर

कला अकादमीच्या भारतीय संगीत व नृत्य विभागातर्फे गुरू पौर्णिमा उत्सवाचे आयोजन

Published

on

Spread the love

गोवा खबर:दरवर्षीप्रमाणे कला अकादमीच्या भारतीय संगीत व नृत्य विभागातर्फे गुरू पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ जुलै रोजी गुरू पौर्णिमा आणि २३ जुलै रोजी संगीत मेळावा असा दोन दिवसांचा संगिताचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. २२ जुलै रोजी कला अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर सभागृहात दुपारी ठीक ३.०० वाजता मान्यवरांहस्तेदिप प्रज्वलाने कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे व तद्नंतर गुरूपूजनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार आहे.

शास्त्रीय सहगायन, संवादिनी सहवादन, कथ्थक नृत्य, भरतनाट्यम अशा कार्यक्रमाद्वारे गुरू पौर्णिमा कार्यक्रम संपन्न  होणार आहे.

२३ जुलै रोजी सकाळी १० वाजता कला अकादमीच्या पेडणे, सांखळी, वाळपई, सांगे, केपे व काणकोण या संगीत केंद्रातील विध्यार्थ्यांचा संगीत मेळावा हा शास्त्रीय गायन वादनाचा कार्यक्रम हेणार आहे.

दोन दिवसांचा हा संगीत कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्व संगीत प्रेमी रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे कला अकादमीच्या भारतीय संगीत व नृत्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Trending

Exit mobile version