गोवा खबर:कला अकादमीतर्फे आयोजित केलेल्या प. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती विभागिय महिला कलाकार भजन स्पर्धेच्या केंद्र क्र. ४ वरील निकाल जाहीर करण्यात आला असून यात श्री राम सेवा संघ महिला भजनी मंडळ, मयडे-बार्देश यांना प्रथम तर श्री साई दिगंबर महिला भजनी मंडळ आसगांव बार्देश यांना व्दितीय पारितोषिक प्राप्त झाले असून ही दोन्ही पथके राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत.
सदर केंद्रावरील तृतीय पारितोषिक स्वर साधना सांस्कृतिक कला संस्था, चोडण तिसवाडी यांना जाहीर करण्यात आले आहे. या केंद्रावरील उत्तेजनार्थ पारितोषिक ओमकार महिला भजनी मंडळ, कोलवाळ-बार्देश, शिवप्रसाद सातेरी महिला भजनी मंडळ, देऊळवाडा तुये पेडणे व भगवती महिला भजनी मंडळ, विर्नोडा पेडणे यांना प्राप्त झाली आहेत. उत्कृष्ट गायनाचे पारितोषिके कु. दिव्या पांडुरंग चारी आणि सौ. शांती किशोर तिळवे यांना देण्यात आली. कु. पूजा देविदास गावडे यांना उत्कृष्ट गवळण, भारूड गायनासाठीचे पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्टपखवाज साथीच्या पारितोषिकासाठी कु. वृदा उल्हास कुंकळकर यांची निवड करण्यात आली आहे तसेच कु. जान्हवी उमेश उडते यांना संवादिनीसाठीचे पारितोषिक देण्यात आले आहे. या केंद्रावर दामोदर पां हेदे, प्रसाद गांवस व श्रीपाद नाईक गावणेकर यांनी परीक्षणाची जबाबदारी सांभाळली.
या केंद्रावरील स्पर्धेचे आयोजन श्री राष्ट्रोळी साई मंदिर ट्रस्ट, मरड, सांगोल्डा-बार्देश व रूतुराज गार्डन हॉल, पोडवाल वाडा, खोर्जुवे-बार्देश यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.