गोवा खबर:कवळे येथील श्री शांतादुर्गा “गुरुकुल” पूर्ण दिवस शाळेच्या विदयार्थ्यांतर्फे देवशयनी आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल नाम गजरात यशस्वी दिंडी आयोजित करण्यात आली. सदर दिंडी कवळे श्री शांतादुर्गा गुरुकुल शाळेपासुन ते श्री विठ्ठल देवस्थान दुर्गाभाट इथपर्यंत आयोजित केली होती.
या दिंडी मध्ये सर्व विद्यार्थ्यांसोबत, शिक्षक , शाळेचे इतर कर्मचारी तसेच पालकही उत्स्फुर्तपणे सामिल झाले. विठ्ठल व रखुमाईच्या वेशातले कु यश जल्मी ; कु. सुरश्री गोपाळ गावकर तसेच वारकरी वेशातले गुरुकुलचे उत्साही विद्यार्थी; डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन नऊवारीतील छोट्या विद्यार्थिनी या दिंडी सोहळ्याचे खरे आकर्षण ठरले. भर पावसात गुरुकुलच्या विद्यार्थांच्या उत्साहाला मात्र खरा पुर आलेला ज्याची वाटसरू प्रेक्षकांनी विशेष स्तुती केली.
सकाळी ९.०० वाजता सुरू पदयात्रेची सांगता श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात येऊन झाली.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांना व दिंडीत सामील वारकऱ्यांना चैतन्य उपासना केंद्र, दुर्गा प्रतिष्ठान व पारायण समिती फोंडा उपासना तर्फे अल्पोपाहार देण्यात आला. फोंडा ट्रैफिक सॅल तसेच फोंडा एडीइआय विभागाचे देखील यावेळी सहकार्य लाभले.
संपूर्ण सोहळा सुंदररित्या पार पाडल्या बद्दल गुरुकुलचे प्रमुख श्री संभाजी खामकर तसेच श्री शांतादुर्गा शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री श्रीकुमार सरज्योतीषी यांनी सर्व सहकार्य केलेल्या संस्थांचे व पालकांचे विशेष आभार मानले.