गोवा खबर:डॉ. सिद्धी काशिनाथ जल्मी, स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस अँड बायोटेक्नॉलॉजी, गोवा विद्यापीठातील वनस्पतिशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक आणि डॉ. संगीता महाबलेश्वर नाईक, स्कूल ऑफ अर्थ, ओशन अँड ॲटमॉस्फेरिक सायन्सेस येथील मरीन मायक्रोबायोलॉजीच्या सहाय्यक प्राध्यापक यांना सीएसआयआर- एएसपी आयआरई अंतर्गत प्रतिष्ठित संशोधन अनुदान मिळाले आहे. भारत सरकारचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम आणि पाचही विषयांतर्गत भारतातील ३०० महिला शास्त्रज्ञांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. सिद्धी जल्मीला जीवन विज्ञान विषयात अनुदान मिळाले आहे आणि डॉ. संगीता नाईक यांना आंतर/ट्रान्स डिसिप्लिनरी सायन्सेसमध्ये मिळाले आहे.
डॉ. सिद्धी जल्मी सध्या गोव्यातील सॉल्ट टोलरन्ट इडिजेनस राईस जातींवर काम करीत आहेत. या महत्त्वाच्या गोव्यातील तांदळाच्या वाणांची लागवड गोव्यात कमी होत असल्याने या वाणांचा देशभर प्रचार आणि प्रसार करणे हे तिचे उद्दिष्ट आहे. डॉ. संगीता यांचे सागरी वातावरणातील हानिकारक अल्गल ब्लूम्स (HABs) वर काम करण्याचे उद्दिष्ट आहे.