गोवा खबर

स्व.बा.ब.बोरकर यांची पुण्यतिथी संपन्न

Published

on

Spread the love

 गोवा खबर: मिनेझिस ब्रागांझा संस्थेने संत सोइरोबानाथ आंबिये, सरकारी कला आणि वाणिज्य महाविध्यालय विर्नोडा, पेडणे यांच्या सहकार्याने पेडणे येथे पद्मश्री स्व. बा ब बोरकर (बाकीबाबा) यांच्या ४६ व्या पुण्यतिथीचे आयोजन केले होते.

गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत भगवंत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. मिनेझिस ब्रागांझा संस्थेचे अध्यक्ष श्री. दशरथ के. परब, स्व. बा ब बोरकर यांच्या कन्या श्रीमती. मुक्ता आगशीकर, श्रीमती. भारती हेबळे, डॉ.अजय वैद्य, डॉ.प्रविणा केरकर, संत सोइरोबानाथ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अशोक परब, आयएमबीचे सदस्य सचिव डॉ.नीता तोरणे, मानसी धाऊसकर व इतर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांच्या हस्ते स्व..बा.ब.बोरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. डॉ. प्रविणा केरकर यांनी स्वागत केले, श्री. दशरथ परब यांनी आपल्या भाषणात स्व.बा.ब.बोरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला व कोकणी व मराठीतील एक एक कविता, तसेच स्व..बा.ब.बोरकर यांच्या गद्य पुस्तकांविषयी सांगितले. त्यानंतर संत सोइरोबानाथ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी काही कवितांचे पठण केले. डॉ. अजय वैद्य यांनी स्व.बा.ब.बोरकर यांच्या कोकणी आणि मराठी कविता कथनासह सादर केल्या.

श्री. अशोक परब आणि डॉ.नीता तोरणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संत सोइरोबानाथ महाविद्यालयातील कोकणी, मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Trending

Exit mobile version