गोवा खबर

कला सन्मान योजना आता ऑनलाइन

Published

on

Spread the love

 गोवा खबर: गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्यावतीने कला सन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात  येते. या योजनेखाली  गरजू ज्येष्ठ कलाकारांना दरमहा २५००/- रूपये आणि गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झालेल्या कलाकारांना दरमहा ३२००/- रूपये आर्थिक मदत देतात. परंतु या योजनेखाली आर्थिक मदत स्वीकारण्याची कलाकाराची तयारी असली पाहिजे. सरकाराकडून कोणतेही पेन्शन घेणारी नसावी.

 कला सन्मान योजनेसोठी अर्ज करताना कलाकाराचे वय ६० वर्षे पूर्ण झालेली असावी. गरजू ज्येष्ठ कलाकारांचे वार्षिक उत्पन्न ४८,०००/- वर असू नये. कलाकाराने कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात योगदान दिलेले असावे किंवा कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात काम केलेले असावे. या योजनेखाली दरवर्षि निधी उपलब्ध आहे त्याप्रमाणे कलाकारांचे अर्ज आर्थिक मदतीसाठी  मंजूर करतात.

कला सन्मान योजनेसाठी या वर्षापासून ऑनलायन अर्ज स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात येते. कलाकार या योजनेसाठी घरून गोवा ऑनलायन सर्व्हिस पोर्टल  https://goaonline.gov.in वरून अर्ज करू शकतो. तसेच कलाकार जवळच्या सीएससीएस/व्हीएलईएस केंद्रावर भेट दिऊ शकतात. उत्तर गोव्यात १७७ आणि दक्षिण गोव्यात १८० मिळून संपूर्ण गोव्यात ३५७ केंद्रे आहेत. कलाकाराने अर्जासोबत आवश्यक दाखले जोडले पाहिजे. कलाकार १४४७१ या टोल फ्री नंबरवर फोन करून जवळच्या सीएससीएस/व्हीएलईएस  केंद्राची माहिती मिळवू शकतो. तसेच कलाकार ग्रामीण मित्राकडे संपर्क करू शकतो.

कला सन्मान योजनेचे अर्ज https://goaonline.gov.in  वर ११ जुलै ते २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी कलाकारांनी कला आणि संस्कृती संचालनालय, पाटो पणजी येथे भेट द्यावी किंवा ०८३२-२४०४६१४ या फोन नंबरवर संपर्क करावा.

            कला आणि संस्कृती संचालनालयाने कला सन्मान योजनेच्या सर्व लाभधारकांनी  राजपत्रित अधिकाऱ्यांनी सही केलेले हयातीचे दाखले वर्षातून दोन वेळा म्हणजे एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात संचालनालयास सुपूर्द केले पाहिजे.

Trending

Exit mobile version