गोवा खबर : सनबर्न या एशियातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (ईडीएम) फेस्टिव्हलतर्फे त्यांच्या १८ व्या पर्वाचे जगभरांत प्रसिध्द अशा वार्षिक महोत्सव असलेल्या सनबर्न गोवा २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यात २८ ते ३० डिसेंबर या तीन दिवसात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये अजोड संगीत, फॅशन, खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
सनबर्न गोवा २०२४ फेस्टिव्हलच्या थीम मध्ये यावर्षी संगीतासह पाण्याखालील जगाची सफर घडणार असून यामध्ये घटकांसह आकर्षक अशा सनबर्नच्या ऊर्जेसह अनोखा सुगंध प्रस्थापित होणार आहे. यावर्षीचा हा फेस्टिव्हल दक्षिण गोव्यात आयोजित करण्यात येत असून सनबर्न चे भविष्यातील दृष्टिकोन लक्षात घेता अनोखा समृध्द अनुभव देण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये अधिक चांगल्या सुविधांसह निसर्गाची दृष्ये आणि जगभरांतील संगिताची आवड असणार्या लोकांसाठी सुयोग्य संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता ट्रॅफिक, प्रवेश, निर्गमन आणि पार्किंग सारख्या समस्यांवर उपाय मिळणार आहे. त्याच बरोबर फेस्टिव्हल मध्ये पुन्हा एकदा कँपसाईट असणार आहे त्याचप्रमाणे फेस्टिव्हल ग्राऊंड्स वर लोक कँप करु शकतील आणि समविचारी व्यक्तीं बरोबर संगितासह अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकतील.
गोव्यातील आपल्या समाजाला दीर्घकालीन अशा घरातील सुविधा देण्यासाठी आणि पर्यावरणासाठी तरुणाईत जबाबदारीची भावना निर्माण करण्याच्या हेतूने सनबर्न तर्फे हरीत उपक्रम सुरु करुन ‘लीव्ह नो ट्रेस’ मोहिमेचीही सुरुवात केली आहे. ‘रिसायकल, रियूज ॲन्ड रिस्टोअर’चे तत्वज्ञान वापरुन या मोहिमेअंतर्गत संगीत आणि पर्यावरण चा आनंद घेण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा उपक्रम म्हणजे सनबर्नची पर्यावरणाशी असलेली वचनबध्दता अधोरेखित करुन फेस्टिव्हल ग्राऊंड्स हे जसे होते तसे पुन्हा देण्यावर भर दिला जाणार आहे. प्लास्टिक, काचा आणि अन्य वस्तूंसाठी रिसायकलिंग स्टेशन्स हे संपूर्ण फेस्टिव्हल दरम्यान आणि नंतर सुध्दा विविध ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. रोजची साफसफाई ही २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान करण्यात येणार असून यामुळे ही जागा पूर्वीसारखी ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.
सनबर्न चे सीईओ करण सिंग यांनी सांगितले “अजोड अनुभव देण्याचे वचन देणार्या आणि सर्वात आवडीच्या फेस्टिव्हलच्या पुढील पर्वाचे नवीन जागेत आयोजन करतांना आम्ही खूपच उत्साही आहोत. दरवर्षी कार्यक्रमाचा दृष्टिकोन उंचावून अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तसेच आमच्यासह दक्षिण गोव्यातील लोकांना हा अनुभव देण्यास आम्ही उत्सुक आहोत. आंम्हाला आशा आहे की संपूर्ण जगभरांतील रसिक प्रेक्षकांना इकडे येऊन प्रेमासह नृत्याचा अनुभव हा गोव्याच्या सौंदर्याने युक्त भूमीवर घेण्याची संधी प्राप्त होईल. आजपर्यंतचा सर्वाधिक चांगला सनबर्न फेस्टिव्हलचा समृध्द आणि आकर्षक अनुभव देऊन सर्वात मोठा उत्सव करण्यास आम्ही वचनबध्द आहोत. या वर्षीचा आमचा विषय हा अकल्पनीय निर्मितीसह आकर्षक सौंदर्य निर्माण करेल आणि फेस्टिव्हल ला समुद्राच्या आवाजासह सुंदर संगीत आणि पाण्याचा खळखळाट एकत्र ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे.”
ट्रॅव्हल ॲन्ड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे अध्यक्ष श्री जॅक सुखीजा यांनी सांगितले “ सनबर्न मुळे गोव्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळाली आहे, स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली असून, विविध क्षेत्रातील व्यवसायांत वाढ झाली आहे, हे सर्व फेस्टिव्हलच्या जागतिक स्तरा मुळे शक्य झाले आहे. जगभरांतील अशा उपक्रमांमुळे पर्यटनाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. एक जागतिक स्तरावरील सांगितिक कार्यक्रम असल्याने आंम्हाला आशा आहे की सनबर्न मुळे दक्षिण गोव्यामध्ये असे दृष्य दिसेल. या वर्षी सनबर्न गोवा मुळे दक्षिण गोवा आता सांगितिक नकाशावर आपली मोहोर उमटवेल आणि यामुळे हॉटेल्स, एफॲन्डबी, वाहतूक आणि अशा अनेक गोष्टीही यावेळी घडतील. आंम्हाला आशा आहे की हा फेस्टिव्हल सर्व नियामकांच्या निकषांसह घनकचरा व्यवस्थापनाचे निकष पूर्ण करेल.”
सनबर्न फेस्टिव्हल २०२४ हा एक केवळ सांगितिक फेस्टिव्हलच नाही तर ही एक जीवनशैली आहे. तर मग वर्षाचा शेवट अधिक नव्या उंचीवर न्या. आत्ताच नोंदणी करा आणि सुरियल अंडरवॉटर वर्ल्ड ला भेट देऊन तुम्ही संगीत, नृत्य आणि सौंदर्याचा आस्वाद अनुभवा.