- कार्यक्रमाच्या १०व्या आवृत्तीसाठी २००० हून अधिक सहभागी
- २० जुलै नोंदी करण्याची अंतिम तारीख
- कार्यक्रमातून जमा झालेली रक्कम रोटरी क्लब ऑफ पर्वरी प्रकाश कॅन्सर एड प्रोजेक्टकडे जाणार
गोवा खबर : रोटरी रेन रनच्या १०व्या आवृत्तीसाठी एकूण २००० अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. हा रन रविवारी २८ जुलै रोजी गोव्यात होणार आहे. चार वेळा आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण करणारी कोरिना व्हॅन डेम, आयर्नमॅन ट्रायथलॉन पूर्ण करणारी आणि पाच वेळा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड धारक प्रीती मस्के तसेच साडी घालून धावणारी आणि त्यासाठी वर्ल्ड रेकॉर्ड बजावणारी क्रांती साळवी या आवृत्तीमध्ये धावणार आहे.
रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट पर्वरीच्या सहयोगाने आयोजित केलेली ही वार्षिक धाव गोव्यात वर्षानुवर्षे प्रसिद्धी प्राप्त करत आहे. यंदाच्या आवृत्तीत ज्येष्ठांसाठी नवीन २ किमी वॉक देखील आयोजित करण्यात येणार.
रोटरी रेन रन मॅरेथॉनला भारतीय लष्कर आणि नौदलाने पाठिंबा दिला आहे. शारीरिक तंदुरुस्ती, निरोगीपणा आणि व्यक्तींमध्ये एकंदर तंदुरुस्तीचे महत्त्व वाढवण्याचा उद्देश हा कार्यक्रम ठेवतो. सहभागींना निरोगी सवयी अंगीकारण्यासाठी, माहितीपूर्ण निवडी करण्यासाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य देण्यासाठी प्रेरित करण्याचे एक व्यासपीठ म्हणून हा कार्यक्रम काम करणार, असे रोटरी क्लब ऑफ पर्वरी अध्यक्ष अर्चना सावंत यांनी सांगितले.
गोवा ॲथलेटिक्स स्टेडियम बांबोळीच्या स्पोर्ट्स अथॉरिटीमध्ये ही धाव सुरू होणार आहे. धावपटूंना भारतीय लष्कर आणि भारतीय नौदलाचे स्वयंसेवक मदत करतील. दोन किमी फन वॉक, पाच किमी ड्रीम रन, १० किमी आणि २१ किमी वेळेनुसार धाव या श्रेणी यंदाच्या रोटरी रेन रनमध्ये असतील, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन दोन किमी वॉक आयोजिय करण्यात येणार. या सर्व श्रेणीच्या नोंदणी प्रक्रिया सुरु झाल्या आहेत, इच्छुकांनी आवडती श्रेणी निवडून त्यात भाग घ्यावा अशी आयोजकांची विनंती आहे.
२१ किमीची वेळमापत वॉक मिरामार सर्कलला वळसा घालून जाईल. तर धावांसाठी असलेले मार्कर वेगवेगळ्या श्रेणींसाठी फिनिश लाइन दाखवतील. २० जुलै रोजी सर्व श्रेणींची नोंदणी प्रक्रिया बंद होईल.
आम्हाला या प्रसिद्ध कार्यक्रमाची १०वी आवृत्ती साजरी करताना खूप आनंद होतोय. रोटरी रेन रन ही केवळ स्वतःला निरोगी आणि सक्रिय ठेवण्याचे प्रतीक नाही तर महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीची धाव आहे, असे रोटरी रेन रन मॅरेथॉनचे अध्यक्ष आणि प्रवक्ते अविनाश सिंग परमार यांनी सांगितले.
ट्रायथलीट गिरीश सावंत यांनी संयोजित केलेल्या रोटरी रेन रन मॅरेथॉनचा मुख्य उद्देश म्हणजे निरोगी जीवनशैली जगण्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे असा आहे.
धावण्यामुळे हाडं मजबुत होतात, स्नायू बळकट होतात, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी तंदुरुस्ती सुधारण्यास आणि निरोगी वजन राखण्यास मदत होते. आपली बैठी जीवनशैली अनेक आजारांना कारणीभूत आहे, त्यामुळे असा व्यायाम गरजेचा आहे, या वर्षी सहभागी मोठ्या संख्येत आले आहेत, असे गिरीश सावंत म्हणाले.
दहाव्या आवृत्तीत ही रन आरोग्यदायी पद्धतींना प्रोत्साहन देणार आणि महिलांच्या आरोग्य आणि शिक्षणाला समर्थन देणार. रोटरी क्लब ऑफ पर्वरी प्रकाश कॅन्सर एड प्रोजेक्ट्स (पीसीएपी) द्वारे मोफत स्तन आणि सर्व्हायकल कॅन्सर या विषयावर जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
पीसीएपीचे चेअरपर्सन शेफान शेख म्हणाले, रोटरी रेन रनमधून मिळणारी रक्कम पीसीएपीला सपोर्ट करण्यासाठी समर्पित आहे. वर्षभरात, आम्ही इतर कार्यक्रमांसह महिला-केंद्रित आरोग्य शिबिरे, कर्करोग-तपासणी उपक्रम आणि आरोग्य चर्चा आयोजित करणार आहोत.