गोवा खबर

उन्नाव रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त, मदत केली जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उन्नावमधील रस्ते अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने समाज माध्यमावर पोस्ट केले, ‘उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेला रस्ते अपघात अत्यंत दुःखदायक आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांप्रति मी सहवेदना व्यक्त करतो. अशा कठीण परिस्थितीत ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. यासोबतच, या दुर्घटनेत जखमी झालेले लोक लवकरच बरे होतील अशी मी कामना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत आहे’.

उन्नाव येथील दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

Trending

Exit mobile version