गोवा खबर : भाजपचा जावई ठेकेदार असलेल्या जीवघेण्या पत्रादेवी-बांबोळी महामार्गावर सर्वात भ्रष्ट भाजप सरकारला आणखी किती जीव घ्यायचे आहेत, असा सवाल गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी उपस्थित केला.
गोवा काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र गावकर यांनी एनएच 66 वर नुकत्याच झालेल्या भूस्खलनाच्या काही तास आधी धोक्याचा अंदाज वर्तवला होता. त्यांचे भाकीत खरे ठरले आणि राष्ट्रीय महामार्ग बंद झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सामोरे जाण्यास घाबरत असल्याचे दिसून येत आहे. आजची घटना म्हणजे भ्रष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकसित भारत आहे, असे सांगून कंत्राटदाराला तात्काळ अटक करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी पाटकर यांनी केली.