गोवा खबर : कला अकादमी गोवा आयोजित पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती विभागीय स्तरावरील भजन स्पर्धेला ८ जुलैपासून वास्को येथील रविंद्र भवनच्या मुख्य सभागृहात होणा-या महिला कलाकारांच्या स्पर्धेने सुरुवात होत आहे.
महिला कलाकारांची विभागीय स्पर्धा ही ८ ते १६ जुलै दरम्यान आयोजित केलेली आहे. यंदा महिला विभागात एकूण ६४ पथके सहभागी झाली असून स्पर्धेचा कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. बाल व पुरुष कलाकार स्पर्धेचा कार्यक्रम मागाहून जाहीर करण्यात येणार आहे.
वास्को येथील रविंद्र भवनच्या मुख्य सभागृहात ८ रोजी होणा–या केंद्र क १ व सत्र क. १ मध्येरुमडेश्वर दत्तात्रय सांस्कृतिक महिला मंडळ, रुमडावाडा – वास्को, शिव समर्थ सांस्कृतिक मंडळ, वास्को, तिरुपती बालाजी सांस्कृतिक संस्था, हेड लॅण्ड सडा- वास्को, ऋषी दत्तात्रय महिला भजनी मंडळ, ओरुलें – वास्को, स्वरब्रह्म संगीत सांस्कृतिक संस्थान, एलमोन्त – वास्को,दामोदर महिला भजनी मंडळ, मुर्डी, कासावली, गजानन भोगदेश्वर महिला भजनी मंडळ, बोगदा – वास्को, सातेरी महिला भजनी मंडळ, शिंदोळी, सांखवाळ व हनुमान महिला भजनी संस्कृत संस्था नॉन मॉन- वास्को ही पथके सहभागी होणार आहेत.
९ रोजी होणा–या सत्र क्र. २ मध्ये ब्राम्हणेश्वर महिला भजनी मंडळ, बेलाबाय – वास्को, रणरागिणी महिला भजनी मंडळ, नॉन मॉन- वास्को, पार्वती महिला मंडळ श्रीस्थळ – काणकोण, संगीत शारदा विद्यालय मंदिर, धाकटे भाट, डोंगरी – तिसवाडी, नागेश महारुद्र भजनी मंडळ, कुडका – तिसवाडी, राष्ट्रोळी जय संतोषी माता महिला भजनी कलाकार, नवेवाडे – वास्को, लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळ, हेडलॅण्ड सडा – वास्को व कृष्ण भजनी मंडळ, काणकोण ही पथके सहभागी होणार आहेत.
भिरोंडा – सत्तरी येथील पंचायत हॉलमध्ये १० जुलै रोजी होणा–या केंद्र क्र २ कलाकार वर्ग आणि भजनी मंडळ, मंडळ, घोटेली नं. २, केरी – सत्तरी, ॐ आजोबा कल्चरल असोसिएशन, केरी – सत्तरी,साई कृपा महिला भजनी मंडळ, मुळगांव – डिचोली, धनलक्ष्मी सेल्फ हेल्प ग्रुप, मये- डिचोली, रवळनाथ महिला भजनी मंडळ, न्हावेली – साखळी व स्वरदीप कल्चरल असोसिएशन, आमोणा – डिचोली ही पथके सहभागी होणार आहेत व सत्र क्र. १ मध्येआजोबा महिला नाटय होंडा – सत्तरी, साई सातेरी आजोबा भजनी साई सातेरी बारावंश, न्यू कॉलनी, मोर्ले–सत्तरी, तर ११ जुलै रोजी होणा–या सत्र क्र. २ मध्ये शांतादुर्गा भजनी मंडळ, कारापूर- डिचोली,भुमिका महादेव कर्वेश्वर महिला मंडळ साळ – डिचोली, यशकिर्ती सांस्कृतिक मंडळ मुळगांव – डिचोली,लइराई केळबाई महिला भजनी मंडळ, बागवाडा, मुळगांव- डिचोली, महादेव भुमिका घवनाळेश्वर महिला, साळ – डिचोली, देवी माऊली कला किडा आणि सांस्कृतिक मंजनी मेणकुरे – डिचोली, गजानन महिला भजनी मंडळ, साकोर्डा – धारबांदोडा व ॐ दुधसागर भजनी मंडळ, काले- धारबांदोडा ही पथके सहभागी होणार आहेत.
लाडेवाडा, मडकई–फोंडा येथील वैरागी दहाजण सभामंडपमध्ये१२ जुलै रोजी होणा–या केंद्र क्र ३ व सत्र क. १ मध्ये मदनंत सातेरी खामिणी महिला भजनी मंडळ, सावईवेरे–फोंडा, साईनाथ महिला भजनी मंडळ, भोमा- फोंडा, केळबाय सातेरी महिला भजनी मंडळ, कुर्टी – फोंडा, शांताई सेल्फ हेल्प ग्रुप, कुंकळये, म्हार्दोळ – फोंडा, गडेश्वर महिला भजनी मंडळ, दवर्ली – फोंडा, साई समर्थ महिला भजनी मंडळ, सावई–वेरे–फोंडा, सातेरी महालसा महिला भजनी मंडळ, म्हार्दोळ–फोंडा व शांतादुर्गा रामनाथ महिला भजनी मंडळ, बांदोडा – फोंडा ही पथके सहभागी होणार आहेत, तर१३ जुलै रोजी होणा–या सत्र क्र. २ मध्ये महालक्ष्मी महिला भजनी मंडळ, तिवरें, मार्शेल–फोंडा, सातेरी खामिणी महिला भजनी मंडळ, बेतकी – फोंडा युवती भजनी मंडळ, अडकोण, बाणास्तारी – फोंडा, निवळेश्वर महिला भजनी मंडळ, मडकई- फोंडा, पांडुरंग ब्रह्मेश्वर मंडळ, आखाडा, सांतईस्तेंव्ह – तिसवाडी, खामिणी प्रासादिक मंडळ केरी–फोंडा, नागेश महारुद्र सातेरी महिला मंडळ म्हार्दोळ–फोंडा व मदनंत खामिणी महिला भजनी मंडळ, सावई–वेरे–फोंडा ही पथके सहभागी होणार आहेत.
१५ जुलै रोजी मरड, सांगोल्डा – बार्देश येथील राष्ट्रोळी साई मंदिरमध्ये होणा–या केंद्र क्र ४ व सत्र क्र. १ मध्ये राष्ट्रोळी ब्राह्मण प्रगती सेवा महिला भजनी मंडळ, कामुर्ली – बार्देश, साई दिगंबर महिला भजनी मंडळ, आसगांव – बार्देश, राष्ट्रोळी लक्ष्मीनारायण महिला भजनी मंडळ, साळगांव – बार्देश, शिवप्रसाद सातेरी महिला भजनी मंडळ, देऊळवाडा, तुये, पेडणे,देव सत्पुरुष महिला भजनी मंडळ, मोरजी- पेडणे, राष्ट्रोळी स्वराज्ञी महिला भजनी मंडळ, मांद्रे- पेडणे, भगवती महिला भजनी मंडळ, विर्नोडा- पेडणे व संत सोहिरोबानाथ आंबिये सांस्कृतिक महिला मंडळ पालये – पेडणे ही पथके सहभागी होणार आहेत.
१६ जुलै रोजी पोडवाल वाडा, खोर्जुवे- बार्देश येथील ऋतुराज गार्डन हॉलमध्ये होणा–या केंद्र क ४ व सत्र क्र. २ मध्ये राष्ट्रोळी ब्राह्मण साई महिला भजनी मंडळ, खोर्जुवे, हळदोणा – बार्देश, कुलदेवता महिला भजनी मंडळ, विर्नोडा – पेडणे, राम सेवा संघ महिला भजनी मंडळ, मयडे – बार्देश, स्वर साधना सांस्कृतिक कला संस्था, चोडण – तिसवाडी, ॐ कार महिला भजनी मंडळ कोलवाळ – बार्देश, गोमंत भारती महिला भजनी मंडळ, करमळी – तिसवाडी व स्वामी सदानंद संगीत संस्था, चोडण तिसवाडी ही पथके सहभागी होणार आहेत.
स्पर्धेला दुपारी २.३० वाजता सुरुवात होणार
असून प्रत्येक पथकाने आपले सत्र सुरु होण्याच्या अर्धा तास अगोदर सर्व कलाकारांसह स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित रहावे. स्पर्धेचा अनुक्रम चिठ्ठया टाकून ठरविण्यात येईल व तो सर्वांवर बंधनकारक राहील. सादरीकरणाचा अनुक्रम न पाळणा–या पथकांना भजन सादर करु दिले जाणार नाही व सदर पथक स्पर्धेतून बाद ठरविण्यात येईल याची सर्व पथकांनी दखल घेउन सहकार्य करावे, असे आवाहन कला अकादमीने केले आहे.