गोवा खबर

मुख्यमंत्र्यांकडून वेदांता सेसा गोवाच्या मोबाईल आरोग्य युनिटचे उद्घाटन

Published

on

Spread the love

गोवा खबर :  मुख्यमंत्री, डॉ. प्रमोद सावंत यांनी आमोणा पंचायतीकडे वेदांता सेसा गोवाच्या मोबाईल हेल्थ युनिटला (एमएचयु) हिरवा बावटा दाखवला. वेदांताच्या मूल्यवर्धित सेवेद्वारे (व्हीएबी) प्रदान केलेल्या प्राथमिक वैद्यकीय सेवांचा आवाका वाढविण्यास एमएचयु मदत करणार आहे. आमोणा पंचायतीकडे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमोणाचे सरपंच कृष्णा गावस, मूल्यवर्धित सेवेचे (व्हीएबी) मुख्य कार्यकारी अधिकारी सप्तेश सरदेसाई तसेच कंपनीचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

सावंत म्हणाले,  वेदांता सेसा गोवाने आमोणा आणि नावेली या गावातील सर्व लोकांना लाभ व्हावा या उद्देशाने मोबाईल हेल्थ युनिट प्रकल्प सुरू केला आहे. ते आता हेल्थकेअर सेंटर्समधून, मोबाईल हेल्थ युनिट्सकडे वळत आहेत, जो वेदांताचा एक उत्तम उपक्रम आहे. अधिकाधिक लोकांना वेदांताने प्रदान केलेल्या या आरोग्य सेवांचा लाभ घेता येईल.

व्हीएबी, आरोग्य प्रकल्पाचा एक भाग म्हणून सध्या आमोणा आणि नावेली येथे कम्युनिटी मेडिकल सेंटर (सीएमसी) चालवत आहे. एमएचयुच्या माध्यमातून सेवांचा विस्तार केल्याने बेतकी, खांडोळा आणि आसपासच्या परिसरातील लोकांना देखील मूलभूत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. सध्या सीएमसीमध्ये दरवर्षी अंदाजे ६०००
लोकांना सेवा देण्यात येते. अत्यावश्यक आरोग्य सेवा लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी एमएचयुची रचना करण्यात आली आहे. आता अतिरिक्त ३००० पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश प्रदान करणे शक्य होईल. एमएचयु कर्करोग तपासणी, दंत/नेत्र/ त्वचा/ हृदय व रक्तवाहिन्यांच्या समस्यांशी संबंधित, विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करून,
वैद्यकीय सहाय्य प्रदान करण्यास मदत करेल. त्यात पात्र स्थानिक डॉक्टर आणि परिचारिका यांचा समावेश असेल, जे वैद्यकीय सेवा प्रदान करतील.

नवीन जाजू याप्रसंगी म्हणाले, आरोग्य या प्रकल्पाचा एक भाग म्हणून वेदांतामध्ये आम्ही, ज्या समुदायात काम करतो, त्यांना मूलभूत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न केला आहे. डिचोलीमध्ये आमची एक सुस्थापित एमएचयु कार्यरत असून आता आम्ही अमोणामधील विद्यमान सुविधा वाढवल्या आहेत. आम्ही विशेष वैद्यकीय आरोग्य शिबिरे, वैद्यकीय उपकरणांचे वितरण आणि विविध बाह्य आणि सामुदायिक स्तरावरील उपक्रमांद्वारे, सामुदाय आरोग्य उपक्रमांना पाठिंबा देत आहोत.

सरदेसाई म्हणाले, व्हीएबीमध्ये आम्ही सेवा देत असलेल्या समुदायांचे आरोग्य सुधारण्यासाठी मनापासून वचनबद्ध आहोत. एमएचयुची सुरुवात, ही अत्यावश्यक आरोग्य सेवा सर्वांसाठी त्यांच्या दारात उपलब्ध आहेत, याची खात्री करण्याच्या दिशेने आमचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महिलांसाठी आयोजित होणारी आमची विशेष आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांचे निरोगी आरोग्य आणि अधिक समावेशक समाज निर्माण करण्याच्या आमच्या समर्पणावर अधिक भर देतात. आम्ही एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. तसेच आमच्या भागधारकांसाठी शाश्वत आणि भरभराटीचे भविष्य निर्माण करण्याच्या आमच्या मोहिमेसाठी आम्ही तत्पर राहतो.

Trending

Exit mobile version